मनसे इचलकरंजी शहर व मराठा महासंघ इचलकरंजी शहर यांच्या संयुक्त विद्यमानाने शिवतिर्थ चौका मध्ये निषेध व्यक्त करण्यात आला.

 


दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

इचलकरंजी : मनसे इचलकरंजी शहर व मराठा महासंघ इचलकरंजी शहर यांच्या संयुक्त विद्यमानाने कर्नाटक बेंगलोर येथे महाराष्ट्राचे हिंदुस्तानाचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे  विटंबना केली होती त्याच्या निषेधार्थ इचलकरंजी येथील  शिवतिर्थ चौका मध्ये निषेध व्यक्त करण्यात आला.

 या प्रसंगी मनसे इचलकरंजी शहराध्यक्ष प्रतापराव पाटील उपजिल्हाअध्यक्ष रवी गोंदकर उपतालुका अध्यक्ष शहाजी भोसले उपतालुका अध्यक्ष दीपक पवार सहकार सेनेचे जिल्हा अध्यक्ष मनोहर जोशी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष मोहन मालवणकर रोजगार स्वयंरोजगार विभागाचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र निकम महिला सेना जिल्हाध्यक्षा सौ सिंधुताई शिंदे शिरोळ तालुका अध्यक्ष शकुंतला कांबळे तालुका उपाध्यक्ष सुनिता पडियार मराठा महासंघाचे शहराध्यक्ष संतोष सावंत जिल्हा संघटक अरविंद माने दिलीप पाटील  व मराठा महासंघाचे कार्यकर्ते होते मनसे रोजगार स्वयंरोजगार प्रसिद्धी जिल्हा अनिरुद्ध पाटील तारदाळ खोतवाडी चे अध्यक्ष बाळासाहेब राजमाने कबनुर चे अध्यक्ष निलेश भालेकर चंदुर चे अध्यक्ष मनोज पाटील विद्यार्थी सेना शहर उपाध्यक्ष रोहित कोटकर मनसे शहर उपाध्यक्ष रामचंद्र बागलकोठे सचिन खाडे शहाजी घाडगे विशाल पाचापुरे यांच्यासह महाराष्ट्र  सैनिक उपस्थित होते....

Comments

Popular posts from this blog

10 वीचे वर्ग मित्र व्हॉट्सॲप माध्यमातून 30 वर्ष एकमेकांपासून दुरावलेले मित्र एकत्र

रविराज जामकर व कार्यकर्ते यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मा.दौलतराव पाटील आण्णा यांच्या प्रमुख उपस्थितत जाहीर प्रवेश

भुयेवाडीत गव्याला हाकलणाऱ्या तरुणावर हल्ला करताच तो जागीच ठार