आदर्श पत्रकार महासंघाची कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणी जाहिरदैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

आदर्श पत्रकार महासंघ या राज्यव्यापी संघटनेची कोल्हापूर जिल्हा कर्यकारिणी नुकतीच जाहिर करण्यात आली.संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार मेहबूब सर्जेखान , राज्य उपाध्यक्ष दत्तात्रय खडके, राज्य सेक्रेटरी महेश कुंभार , राज्य कार्याध्यक्ष गणेश पाखरे, राज्य सदस्य शिवकुमार मुरतुले , राज्य सदस्य खंडू इंगळे , राज्य सदस्य लियाकत सर्जेखान यांच्या मार्गदर्शनाखाली जाहिर करण्यात आलेल्या कार्यकारिणीमध्ये पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी वसंतराव पाटील ( हुपरी समाचार ),जिल्हा अध्यक्षपदी संजय पाटील ( कला दर्पण ,हुपरी )यांची तर कोल्हापूर शहर अध्यक्षपदी जगदिश अंगडी ( प्रेस मिडिया ) यांची निवड करण्यात आली.

अन्य कार्यकारिणीमध्ये कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षपदी भरत घोंगडे ( आम्ही कोल्हापुरी ),जिल्हा कार्याध्यक्षपदी मनु फरास ,जिल्हा संघटकपदी सागर बाणदार ( हँलो प्रभात ) ,कोल्हापूर शहर संघटकपदी मुरलीधर कांबळे ,हातकणंगले तालुका अध्यक्षपदी आप्पासाहेब भोसले (  विशाल क्रांती )यांचा समावेश करण्यात आला आहे.सदर निवडीबद्दल मान्यवरांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी आदर्श पत्रकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मेहबूब सर्जेखान यांनी संघटनेच्या माध्यमातून पत्रकार बांधवांना संघटीत करुन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील रहावे ,असे आवाहन केले. या वेळी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष संजय पाटील यांनी संघटनेच्या माध्यमातून सर्व पदाधिकारी व सदस्यांना विश्वासात घेवून पत्रकार बंधूंना संरक्षण मिळावे ,त्यांना शासकीय सुविधांचा लाभ मिळावा या प्रलंबित मागण्यांसाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करु ,अशी ग्वाही दिली.

या वेळी संघटनेचे कोल्हापूर शहर अध्यक्ष जगदिश अंगडी ,हातकणंगले तालुका अध्यक्ष आप्पासाहेब भोसले यांनी   आदर्श पत्रकार महासंघ या संघटनेचा कार्यविस्तार करण्याबरोबरच संघटीतपणे पत्रकारांच्या न्याय - हक्काचा लढा यशस्वी करुया ,असे आवाहन केले.

या वेळी संघटनेचे नूतन पदाधिकारी ,सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

10 वीचे वर्ग मित्र व्हॉट्सॲप माध्यमातून 30 वर्ष एकमेकांपासून दुरावलेले मित्र एकत्र

रविराज जामकर व कार्यकर्ते यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मा.दौलतराव पाटील आण्णा यांच्या प्रमुख उपस्थितत जाहीर प्रवेश

भुयेवाडीत गव्याला हाकलणाऱ्या तरुणावर हल्ला करताच तो जागीच ठार