अन्यायकारक घरफळा वाढ केल्यास मनसे तीव्र आंदोलन करणार.....
दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

महाराष्ट्र नवनिर्माण सेना इचलकरंजी शहराच्या वतीने प्रांताधिकारी सौ विकास खरात साहेब यांना निवेदन देण्यात आले त्यांचे निवेदन प्रांत कार्यालयाचे शिरस्तेदार श्री संजय काटकर यांनी स्वीकारले. 

निवेदना मध्ये अशी मागणी होती की इचलकरंजी नगरपालिकेने 10% घरफाळा वाढ केला असून तो रद्द व्हावा या साठी निवेदन देण्यात आले त्यांचे कडून असे सांगण्यात आले की आम्ही इचलकरंजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन दिले असता त्यांनी सांगितले शासन स्तरावर ही घरफाळा 10 टक्के वाढ झाले आहे म्हणून आम्ही आपणास शासनाचे प्रतिनिधी म्हणून निवेदन देत आहोत आपत्ती कालीन परिस्थिती असताना या मध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये घरफाळा दहा टक्के वाढ होऊ नये अशी मागणी करण्यात आली . 

निवेदन देतेवेळी इचलकरंजी मनसेचे शहराध्यक्ष प्रतापराव पाटील उपजिल्हाध्यक्ष रवी गोंदकर उपतालुका अध्यक्ष शहाजी भोसले सहकार सेना जिल्हा अध्यक्ष मनोहर जोशी कामगार सेना जिल्हा अध्यक्ष मोहन मालवणकर रोजगार स्वयंरोजगार विभागाचे  जिल्हा संघटक राजेंद्र निकम विद्यार्थी सेनेचे  विनायक मुसळे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय भंडारे  शहर सचिव महेश शेंडे  वाहतुक सेना तालुका अध्यक्ष अनिल झाडबुके महिला सेनेच्या जिल्हाध्यक्षा सौ सिंधुताई शिंदे तालुकाध्यक्ष सुलोचना गाडगे तालुका उपाध्यक्ष लता माने व सरस्वती माने शहर उपाध्यक्ष रामचंद्र बागलकोठे उपाध्यक्ष सौरभ संकपाळ शहर उपाध्यक्ष योगेश दाभोळकर शहर उपाध्यक्ष विशाल तमाशाचे उपाध्यक्ष उत्तम पाटील शहर उपाध्यक्ष कृष्णा कोपर्डे विद्यार्थी सेना शहर उपाध्यक्ष रोहित कोटकर चंदुर तालुका पंचायत विभाग अध्यक्ष नरेंद्र गोंदकर सौरभ गोरे मारुती जावळे रोहन कोटकर अतुल मोहिते प्रकाश गोसावी इत्यादी पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.....*

Post a Comment

Previous Post Next Post