शिरोळ तालुक्यातील २७ गावे क्षारपड मुक्तीकडे
राज्यमंत्री यड्रावकर यांच्या हस्ते सोमवारी कवठेगुलंद येथे सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात
दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : जयसिंगपूर-
शिरोळ तालुक्याला क्षारपड जमिनीचा प्रश्न अनेक वर्षे भेडसावत आहे, अनेक मार्गाने तालुक्यातील क्षारपड झालेल्या जमिनी पिकाखाली आणण्यासाठी चा प्रयत्न सातत्याने सुरू आहे, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी क्षारपड जमिनीचा हा मुद्दा महाराष्ट्र शासन व जलसंपदा मंत्री नामदार जयंत पाटील यांच्या समोर सातत्याने लावून धरल्यानंतर राज्य शासनाने क्षारपड जमीन सुधार योजना साठी काही महिन्यापूर्वी एक परिपत्रक जाहीर करून शासनाचे याबाबतीत चे धोरण जाहीर केले होते, एकूण खर्चाच्या 90 टक्के शासन व 10 टक्के शेतकऱ्यांच्या सहभागातून क्षारपड जमीन सुधार योजना राबवण्याचे निश्चित केले आणि याचाच भाग म्हणून पहिल्या टप्प्यात शिरोळ तालुक्यातील 27 गावांमधून जवळपास 13 हजार 100 एकर क्षारपड जमीन पिकाखाली आणण्यासाठी या जमिनीच्या सर्वेक्षणाच्या कामाला सोमवारपासून सुरुवात होत आहे,
उर्वरित क्षारपड जमीन युक्त गावांचा समावेश दुसऱ्या टप्प्यात घेण्यात येणार आहे, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या माध्यमातून या जमिनीच्या सर्वेक्षणासाठी 60 लाखांचा निधी मंजूर झाला असून शिरोळ तालुक्यातील 27 गावांमधील जमिनीच्या सर्वेक्षणाला सोमवारी कवठेगुलंद येथून सुरुवात होत आहे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते तसेच पाटबंधारे संशोधन व विकास संचालनालयाच्या कार्यकारी अभियंता प्रिया लांजेकर, मान्यवर लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शेतकरी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
Comments
Post a Comment