खेड तालुक्याचे वैभव असेलेल्या किल्ल्ले रसाळगडाचा लवकरच कायापालट होणारदैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा -

छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि खेड तालुक्याचे वैभव असेलेल्या किल्ल्ले रसाळगडाचा लवकरच कायापालट होणार असून तसा प्रस्ताव पुरातत्व विभागाने शासनाकडे पाठवला आहे.लवकरच या प्रस्तावाला मंजुरी मिळून रसाळगडाच्या डागडुजीला सुरवात होणार असल्याने किल्ला प्रेमींमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

खेड तालुक्याच्या पूर्वेला सह्याद्रीच्या कुशीत विसावलेला रसाळगड हा किल्ला खेड तालुक्याचे वैभव मानले जाते. कोकणातील मोहिमेंवर असताना छत्रपती शिवरायांचे या किल्ल्याला वास्तव्य असे इतिहासकार सांगतात. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने हा किल्ला पावन झाला असल्याच्या अनेक खुणाही या गडावर सापडतात.

गडावर असलेले झोलाई देवीचे मंदिर तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या देवीची तीन वर्षांनी एकदा जत्रा होते. या जत्रेला गडावर भाविकांची मोठी गर्दी झालेली पाहायवास मिळते. आजूबाजूच्या ग्रामदेवतांच्या पालख्या गडावर येतात. या जत्रेत ग्रामदेवतांच्या पालख्या नाचविणे भाविकांसाठी पर्वणीच असे.

पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या या किल्ल्याची काही वर्षांपूर्वी डागडुजी करण्यात आली होती. मात्र या कामात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याने डागडुजीवर केलेला खर्च फुकट गेला होता. त्यावेळी झालेल्या भ्रष्टाचार खेड येथील 'रत्नगिरी गडकोट' या संघटनेने चव्हाट्यावर आणला होता. जिल्ह्याधिकारी यांच्याकडे याबाबत तक्रार केल्यावर तत्कालीन जिल्हाधिकारी गायकवाड याना किल्ले रसाळगडला भेट देऊन झालेल्या कामाची पाहणी करावी लागली होती.

पहिल्या टप्प्यात डागडुजीसाठी निधी उपलब्ध होऊनही केवळ ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे किल्ल्याची डागडुजी योग्य प्रकारे झाली नव्हती, त्यामुळे किल्ल्याची तटबंदी ढासळलेलीच होती तर किल्ल्यावरील पाण्याचे तलाव, राजवाडा, आदींच्या दुरुतीचेही काम झालेले नव्हते. पहिल्या टप्प्यात ठेकेदाराने मंदिराच्या छपराचे काम केले होते मात्र हे करताना मंदिरासमोर असलेली दीपमाळेची उंची कमी केल्याने किल्लेप्रेमींकडून नाराजी व्यक्त होत होती.

छत्रपतीला शिवरायांच्या पराक्रमांची साक्ष देणाऱ्या रसाळगडाचा पर्यटनदृष्ट्या कायापालट व्हावा, या गडावर येणाया पर्यटकांची गर्दी वाढवी यासाठी या भागातील सामायिक कार्यकर्ते रामचंद्र आखाडे हे शासन दरबारी अनेक वर्ष प्रयत्न करत होते. त्यासाठी शासनाच्या संबंधित विभागाशी त्यांचा पत्रव्यवहार सुरू होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि रसालडगच्या दुसऱ्या टप्प्यातील डागडुजीसाठी 14 कोटी 16 लाख 21 हजार रुपयांचा निधी मिळावा यासाठीचा प्रस्ताव पुरातत्व विभागाने शासनाला सादर केला.

या प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळून रसगडाच्या दुसऱ्या टप्प्यातील डागडुजीचे कामाला सुरुवात होणार असल्याने रसाळगडाचा लवकरच कायापालट होणार असून रसाळगडाचे पर्यटनदृष्ट्या महत्त्व वाढणार असून त्यामुळे किल्ला प्रेमींमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Post a Comment

Previous Post Next Post