त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी सीमा तपासणी नाक्यावर बंदोबस्त कडक करण्यात आला आहे.
दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :
कोगनोळी : बंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. त्यामुळे बेळगाव येथे शनिवारी (ता.१८) तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. या घटनेचे पडसाद कोल्हापूर जिल्ह्यातही उमटत आहेत. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी सीमा तपासणी नाक्यावर बंदोबस्त कडक करण्यात आला आहे.
राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी येथे असलेल्या कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावरून महाराष्ट्रातील शिवसेनेच्या नेतेमंडळींना कर्नाटक प्रवेशबंदी करण्यात आली आहे. कोगनोळी येथे असणाऱ्या दूधगंगा नदीवरील कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावर पोलिस बंदोबस्त कडक करण्यात आला आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या चारचाकी वाहनांची या ठिकाणी कसून चौकशी करण्यात येत आहे.
निपाणीचे मंडल पोलिस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिल कुंभार, कोगनोळी पोलिस उपठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक एस. ए. टोलगी, शहर पोलिस स्थानकाचे सहाय्यक उपनिरीक्षक एम. जी. मुजावर, पोलिस अमर चंदनशिव, राजू गोरखनावर, एम. एफ. नदाफ यांच्यासह पोलिसांची कुमक परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
Comments
Post a Comment