महापालिकेच्या नगररचना विभागातील अधिकाऱ्यांवरील वाढत्या तक्रारी

माजी पदाधिकाऱ्यांनी  अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.


दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

कोल्हापूर : महापालिकेच्या नगररचना विभागातील अधिकाऱ्यांवरील वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन माजी पदाधिकाऱ्यांनी  अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. बांधकाम परवान्याबाबत नागरिकांची पिळवणूक सुरूच आहे.ज्यांच्याकडून आपले काम होत नाही, असे कर्मचारी, अधिकाऱ्यांना वाटते त्यांच्या फायली गायब होतात. फायली गायब झालेली शेकडो उदाहरणे आहेत, असा आरोप माजी नगरसेवक शारंगधर देशमुख यांनी केला. महापालिकेत माजी पदाधिकारी आणि प्रशासन यांच्या बैठकीत ते बोलत होते. शहरातील विकासकामांबाबत प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या उपस्थितीत माजी पदाधिकाऱ्यांची बैठक स्थायी समिती सभागृहात झाली. यात शहरातील अतिक्रमनावरूनही प्रशासनाला धारेवर धरताच प्रशासक डॉ. बलकवडे यांनी आठ दिवसांत अतिक्रमण कारवाईला सुरुवात करावी, असे आदेश प्रशासनाला दिले.

देशमुख म्हणाले, ''या विभागातील एक महिला कर्मचारी कामे लवकर करत नाहीत. सर्वसामान्य माणसाला झिट आणतात. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमुळे फायली प्रलंबित असतात. बांधकाम परवान्याची फाईल गायब झालेली किती प्रकारणे आहेत ते सांगा. फाईल गायब झाल्याचा नाहक त्रास नागरिकांना होतो. सात ते आठ वर्षे न सापडणारी फाईल कॅम्पला दोन मिनिटांत सापडते. जाणीवपूर्वक हे लोक पिळवणूक करतात. माहितीचा अधिकाराने कार्यालयात येतात त्यांनाच अधिकारी वेळ देतात.

मात्र, सामान्य नागरिकांना कार्यालयात प्रवेश दिला जात नाही.'' जनतेची कामे अडवली जात असल्याचा आरोप देशमुख यांनी करत नगररचना विभागाचे सहायक संचालक रामचंद्र महाजन यांना धारेवर धरले. यावर प्रशासक डॉ. बलकवडे यांनी रोज किती फाईल आल्या आणि किती क्लिअर झाल्या याचा तपशील प्रत्येक आठवड्याला द्यावा, प्रत्येक टेबलावरील माहिती द्यावी, असे आदेश नगररचना विभागाला दिले.

बैठकीला अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी उपमहापौर संजय मोहिते, अर्जुन माने, अशोक जाधव, सचिन पाटील, सुनील पाटील, प्रकाश गवंडी, अशपाक आजरेकर, प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
जाहिरात बातम्यांसाठी संपर्क :

संपादक वसंतराव ध पाटील.

दैनिक हुपरी समाचार साठी कोल्हापूर जिल्ह्यासाठी प्रतिनिधी नेमणे आहेत.

संपर्क : +919860340305

Comments

Popular posts from this blog

10 वीचे वर्ग मित्र व्हॉट्सॲप माध्यमातून 30 वर्ष एकमेकांपासून दुरावलेले मित्र एकत्र

रविराज जामकर व कार्यकर्ते यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मा.दौलतराव पाटील आण्णा यांच्या प्रमुख उपस्थितत जाहीर प्रवेश

भुयेवाडीत गव्याला हाकलणाऱ्या तरुणावर हल्ला करताच तो जागीच ठार