भुयेवाडीत गव्याला हाकलणाऱ्या तरुणावर हल्ला करताच तो जागीच ठार
अन्य दोघे जखमी झाले आहेत
दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :
कोल्हापूर : करवीर तालुक्यातील भुयेवाडीत गव्याला हाकलणाऱ्या तरुणावर हल्ला करताच तो जागीच ठार झाला. अन्य दोघे जखमी झाले आहेत.शनिवारी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास गावातील प्रल्हाद पाटील यांच्या गुऱ्हाळाजवळ गव्याने हा हल्ला केला. सौरभ संभाजी पाटील (वय २१) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. गव्याने त्याच्या पोटात शिंग खुपसल्याने त्याचा कोथळा बाहेर पडला. प्रल्हाद पांडुरंग पाटील (वय ५५) व शुभम महादेव पाटील ( वय २१) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.
पंचगंगा नदीच्या काठावर शुक्रवारी दिवसभर गवा बसून होता. रात्री तो गवा शिवाजी पुलावरून शिंगणापुरकडे गेल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हाच धिप्पाड गवा शनिवारी सायंकाळी भुयेवाडी येथे प्रल्हाद पांडुरंग पाटील यांच्या गुऱ्हाळाजवळ आला. स्वतः प्रल्हाद पाटील त्यावेळी चुलवाणाजवळ होते. तिथे त्यांच्या जनावरांचा गोठा आहे.
Comments
Post a Comment