मला कोणी काय दिले असेल तर ते कागलच्या जनतेने आणि ज्येष्ठनेते शरद पवार यांनी झोळी भरून दिले ...

 


दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

कोल्हापूर : महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात पंधरा वर्षापासून मंत्री म्हणून काम करत आहे. आत महाविकास आघाडीत दोन वर्षापासून आहे. त्यामुळे मला कोणी काय दिले असेल तर ते कागलच्या जनतेने आणि ज्येष्ठनेते शरद पवार  यांनी झोळी भरून दिले आहे, असा पलटवार ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी खासदार संजय मंडलिक यांच्यावर केला. जिल्हा बॅंकेच्या करवीर, गगनबावडा आणि शहरातील ठरावधारकांचा मेळावा महासैनिक दरबार हॉल येथे झाला यावेळी ते बोलत होते.यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, आमदार पी.एन.पाटील, आमदार प्रकाश आवाडे, आमदार विनय कोरे, आमदार जयंतराव आसगावकर आदी उपस्थित होते.

श्री मुश्रीफ म्हणाले, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे नेहमी कौत्तुक करत आलो आहे. 2014 ला विधानसभा निवडणूक झाली. कॉंग्रेस-राष्ट्रवादीची अपेक्षीत आमदार विजयी झाले नाहीत. त्यामुळे भाजप-शिवसेना युती होणार हे स्पष्ट होते. पण गृहमंत्री अमित शहा यांनी उध्दव ठाकरे यांना अडीच वर्ष मुख्यमंत्री करण्याचा दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळे युती तुटल्यानंतर कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सहकार्याने उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि मी दोन वर्षापासून मंत्री म्हणून काम करत आहे.

त्यामुळे जे झोळी फाटेपर्यंत कोणी दिले तर ते कागलच्या जनतेने आणि ज्येष्ठनेते शरद पवार यांनी दिले आहे. आता आम्हा कशाची फारशी अपेक्षा राहिलेली नाही. दुसरीकडे जिल्हा बॅंकेत हसन मुश्रीफ निर्णय घ्यायला कचरले असे बोलले जात आहे. तर हे खर आहे. जिल्हा बॅंक शेतकऱ्यांची बॅंक आहे. नऊ वर्ष प्रशासकीय कारकिर्दीत लोकांचे खूप हाल झाले. आमच्या पॅनेल मोठी झाली. भाषण झाली. बॅंकेची बदनामी झाली. फार मोठा परिणाम बॅंकेच्या कारभारावर होईल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घ्यायला कचरलो. लोकांच्या आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही बॅंक बिनविरोध करण्यावर भर देत राहिलो. राजकीय पादत्राणे बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

Post a Comment

Previous Post Next Post