आज राज्यभरातील भाविकांनी जोतिबा डोंगर गाटला. परिणामी, डोंगर हाऊसफुल्ल..

 आज दिवसभरात दोन लाख भाविक डोंगरावर आले


दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

जोतिबा डोंगर - कोरोना नंतर येणाऱ्या ओमिक्रॉनच्या धास्तीमुळे लॉकडाऊन होईल या भीतीने आज राज्यभरातील भाविकांनी जोतिबा डोंगर गाटला. परिणामी, डोंगर हाऊस फूल्ल झाला. आज दिवसभरात दोन लाख भाविक डोंगरावर आले.मिनी चैत्र यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले. आज मोठ्या गर्दीमुळे दोन किलोमीटर अंतरापर्यंत दर्शन रांग लागली. ठाकरे मिटके गल्लीतून ज्योतिबा एसटी बस स्थानकापर्यंत दर्शन रांग लागली. भाविकांना या गर्दीत श्रींचे दर्शन घेतले.

लॉक डाऊन झाल्यावर सुमारे वर्षभर देवाचे दर्शन घेता येणार नाही. या आशेने आज भाविक सहपरिवार डोंगरावर आले. या गर्दीमुळे यंत्रणेवर मोठा ताण पडला. आज मंदिरात पहाटे घंटानादानंतर धार्मीक कार्यास प्रारंभ झाला.

त्यानंतर पाद्यपूजा, काकड आरती मुखमार्जन झाले.त्यानंतर अभिषेक विधी झाला. त्यानंतर श्रीची पगडी रुपातील सरदारी महापूजा बांधण्यात आली. आज पहाटेपासूनच डोंगर गर्दीने फुलून गेला. आज दिवसभर उन्हाचा तडाखा होता. उन्हात उभे राहून सर्रास भाविकांनी दर्शनाचा आनंद लुटला. आज मंदिर परिसर, सेंट्रल प्लाझा, यमाई मंदिर व बाग या ठिकाणी भाविकांनी उन्हामुळे विश्रांती घेतली. डोंगर आज शोशल ड्रिस्ट्रींगचा फज्जा उडाला .पंचाहत्तर टक्के भाविकांकडे मास्कच न्हवते. भाविक बिनधास्त फिरत होते. आज डोंगरावर कोडोली पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरिक्षक शीतल कुमार डोईजड यांच्या मार्गदर्शनाखाली कडक बंदोबस्त होता. डोंगरावर सर्वत्र श्वान ही फिरविले.

इचलकरंजी येथील सतेज फायटर च्या पंधरा कार्यकर्त्यांनी आमदार सतेज पाटील हे बिनविरोध निवडून आल्याबद्दल इचलकरंजी ते जोतिबा हा ५५ किलोमीटर अंतराचा प्रवास पायी पूर्ण करत दंडवत घातला.

Comments

Popular posts from this blog

10 वीचे वर्ग मित्र व्हॉट्सॲप माध्यमातून 30 वर्ष एकमेकांपासून दुरावलेले मित्र एकत्र

रविराज जामकर व कार्यकर्ते यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मा.दौलतराव पाटील आण्णा यांच्या प्रमुख उपस्थितत जाहीर प्रवेश

भुयेवाडीत गव्याला हाकलणाऱ्या तरुणावर हल्ला करताच तो जागीच ठार