कोणाला तरी सांभाळण्यासाठी, कोणाला तरी मान देण्यासाठी बिनविरोध निवडणूक टाळली...दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

 कोल्हापूर : जिल्हा बँक चांगली चालली आहे यात दुमत नाही. गोकुळ पण चांगलच चाललं होतं. त्या संस्थेत निवडणूक का लावली. गोकुळ मध्ये निवडणूक पाहिजे आणि बँकेत नको असे का ? असाही सवाल मान्यवरांनी आज केला. तर, कोणाला तरी सांभाळण्यासाठी, कोणाला तरी मान देण्यासाठी बिनविरोध निवडणूक टाळली असल्याचा आरोप बँकेचे विद्यमान संचालक बाबासाहेब पाटील- आसुरलेकर  यांनी केला.

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी  निवडणूकीच्या  पार्श्वभूमीवर आज कळंबा येथे शिवसेना प्रणित राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीचा मेळावा झाला. करवीर, गगनबावडा, पन्हाळा आणि कोल्हापूर शहरातील ठरावदार मतदारांचा मेळावा सुरू आहे. यावेळी ते बोलत होते.गोकुळ संचालक अजित नरके म्हणाले, जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी बँकेच्या मतदारांनी भरभरून साथ दिली आहे. सर्वांचाच पाठिंबा मिळत आहे.

शेकापचे केरबा पाटील म्हणाले, ज्यांनी बँक अडचणीत आणली तेच सांगताहेत, जिल्हा बँक चांगली चालली आहे. बँक चांगली चालली आहेत यात दुमत नाही. गोकुळ पण चांगल च चाललं होतं. त्या संस्थेत निवडणूक का लावली. असाही सवाल केला. गोकुळ मध्ये निवडणूक पाहिजे आणि बँकेत नको असे का ? असाही सवाल पाटील यांनी केला.

यावेळी खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबीटकर, माजी आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार सुजित मिणचेकर, माजी आमदार सत्यजीत पाटील, माजी आमदार संपतराव पवार-पाटील, माजी आमदार उल्लास पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे, प्रा. शहाजी कांबळे, बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर, गोकुळ संचालक अजित नरके, एस. आर. पाटील, रवी मडके उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post