रेल्वे माल धक्क्यावर एक बोगी उलटली.

अपघातात सहा माथाडी अडकले तर तीन-चार जखमी .


दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

कोल्हापूर - येथील रेल्वे माल धक्क्यावर एक बोगी उलटली आहे. या अपघातात सहा माथाडी अडकले असून तीन-चार जखमी झाले आहेत.कोल्हापूरातील शाहू मार्केट यार्ड येथे आज दुपारच्या सुमारास ही घटना आहे. या अपघातातील काही जखमींना एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान अजून चारजण अडकले असून त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. रेल्वे मालगाडी धान्य व सिमेंट आणि कडधान्यांची पोते घेऊन आली असल्याची माहिती समोर येत आहे. माल उतरण्याचे काम सुरु असताना अचानक ही घटना घडली असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान गेल्या आठ तासातील कोल्हापुरातील रेल्वे अपघाताशी संबंधित ही दुसरी बातमी

या मध्ये शिराज सुरेश पांडुरंग साधूकडे (वय 41) डोक्याला गंभीर मार लागला आहे. शिराज शब्बीर आदालखान (वय 30) यांच्या छातीला गंभीर दुखापत झाली आहे. राजू पंडित गेंड (वय 28) छाती यांच्या खांद्याला दुखापत झाली आहे. हे तीनजण गंभीर जखमी आहेत. सनी उल्ला खान शेख (वय 41) व सादिक शब्बी शेख (वय 45) मुजाहिद्दीन इमतियाज मुजावर (वय 45) यांनाही दुखापत झाली आहे. हे सर्व शहरातील विक्रमनगर पहिले परिसरात राहणारे आहेत. दरम्यान, घटनास्थळी शहर पोलिस उपाधीक्षक मंगेश चव्हाण, करवीर पोलिस उपाधीक्षक संकेत गोसावी, शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण गवळी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post