ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधातील चार उमेदवारांनी माघारी घेतल्याने त्यांचीही संचालकपदी बिनविरोध निवड झाली.दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची मागच्या दीड महिन्यापासून रणधुमाळी सुरू आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांची मागील १५ दिवसांपूर्वी बिन विरोध निवड झाली.तसेच आज कागल मधून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधातील चार उमेदवारांनी माघारी घेतल्याने त्यांचीही संचालकपदी बिनविरोध निवड झाली.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुक निवडणूक रंगतदार वळणावर आली आहे. जिल्ह्याचे दोन बडे नेते बिनविरोध झाल्याने, अन्य कोणाची निवड बिनविरोध होते का, याकडे लक्ष लागून राहिले आहे.

 KDCC Bank

जिल्हा बँकेसाठी सर्वपक्षीयांना समाविष्ठ करण्याच्या दृष्टीने सत्तारूढ आघाडीच्या पॅनेलचा प्राथमिक आराखडा रविवारी रात्री तयार झाला. या पार्श्‍वभूमीवर आ. पी. एन. पाटील यांच्या निवासस्थानी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांची बैठक झाली. तिघांनी आ. विनय कोरे यांच्याशी फोनवरून संपर्क केला. तासभर झालेल्या या चर्चेत शिवसेना पदाधिकार्‍यांशी सोमवारी (दि.20) चर्चा करून त्यानंतर दुपारी पॅनेलची घोषणा करण्याचे ठरले.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत 12 तालुक्यांतील संस्था गटातील निवडणूक प्रत्येकाने ताकदीवर लढवावी. ताकद नसेल तर सत्तारूढ आघाडीच्या उमेदवाराला पाठबळ द्यावे, असे ठरले होते. त्यानुसार गगनबावडा तालुक्यातून पालकमंत्री सतेज पाटील बिनविरोध झाले.

शिवसेना, भाजप आघाडी, आ. विनय कोरे, आ. प्रकाश आवाडे, राजू शेट्टी, आदींनी सत्ताधार्‍यांसोबत येण्याचे मान्य केले. मात्र, उर्वरित गटातील नऊ जागांवर या सर्वांना समावून घेताना सत्ताधारी नेत्यांना कसरत करावी लागत आहे. पॅनेलची रचना निश्‍चित करण्यासाठी गेल्या चार दिवसांत बैठकांच्या अयशस्वी फेर्‍या झाल्या. आ. कोरे यांचे समाधान होईपर्यंत शिवसेना आणखी दोन जागांवर अडून बसली. त्यामुळे सत्ताधारी आघाडीच्या पॅनेलची घोषणा लांबणीवर पडत गेली.

 KDCC Bank

या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्री सतेज पाटील, ना. हसन मुश्रीफ आणि आ. पी. एन. पाटील यांच्यात सुमारे तासभर बैठक झाली. पॅनेल करताना किती मागे यायचे? शिवसेनेला किती जागा द्यायच्या? आ. कोरे यांच्या समर्थकांना कोणत्या गटातून उमेदवारी द्यायची? याबाबत तिघांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. तिघा नेत्यांनी पॅनेलचा कच्चा मसुदा तयार केला. यानंतर आ. कोरे यांच्याशी फोनवरून संपर्क केला. आता सोमवारी दुपारी शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांशी पालकमंत्री सतेज पाटील आणि ना. हसन मुश्रीफ हे दोघे चर्चा करणार आहेत. यानंतर दुपारी पॅनेलची घोषणा केली जाणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post