कोल्हापुरात परदेशातून नागरिकांचे आगमन सुरूच

परदेशातून आलेल्या नागरिकांची संख्या 576 झाली आहे.



दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : 

 कोल्हापुरात परदेशातून नागरिकांचे आगमन सुरूच आहे. सोमवारी 46 नागरिक परदेशातून आल्याने सोमवार अखेर परदेशातून आलेल्या नागरिकांची संख्या 576 झाली आहे.या मध्ये जोखीमग्रस्त देशांतून आलेल्या नागरिकांचाही समावेश आहे.परदेशातून सोमवारी आलेल्या 46 पैकी 34 नागरिक शहरातील आहेत. उर्वरित प्रवाशांमध्ये भुदरगडमधील 1, गडहिंग्लज 4, हातकणंगले 6, कगल 1, शिरोळ 1 व करवीर तालुक्यातील 2 प्रवाशांचा समावेश आहे.

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची चर्चा सुरू असतानाच दक्षिण आफ्रिकेमध्ये ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर युनायटेड किंगडम, ब-ाझील, बोत्सवाना, चीन, न्यूझीलंड, झिंबाब्वे, सिंगापूर, हाँगकाँग, इस्रायल, नेदरलँड, इटली, पॅरिस आदी देशांतही ओमायक्रॉनचे रुग्ण सापडू लागले.या जोखीम ग्रस्त देशांतूनही नागरिक येऊ लागले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून जोखीमग्रस्त देशांतील विमानसेवेवर निर्बंध घालण्यात आले. विमान प्रवासासाठी लस घेतल्याचे प्रमाणपत्र, कालमर्यादेतील कोरोना चाचणी आदी गोष्टी बंधनकारक करण्यात आल्या आहेत. विमान प्रवाशांची नोंद ठेवण्यात येऊ लागली आहे.

सोमवारअखेर परदेशातून आलेल्या नागरिकांची तालुका निहाय संख्या

आजरा 6
भुदरगड : 13
चंदगड : 11
गडहिंग्लज : 18
गगनबावडा : 1
हातकणंगले : 105
कागल : 10
करवीर : 51
पन्हाळा : 5
राधानगरी : 8
शाहूवाडी : 19
शिरोळ : 48
शहर : 276

Comments

Popular posts from this blog

10 वीचे वर्ग मित्र व्हॉट्सॲप माध्यमातून 30 वर्ष एकमेकांपासून दुरावलेले मित्र एकत्र

रविराज जामकर व कार्यकर्ते यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मा.दौलतराव पाटील आण्णा यांच्या प्रमुख उपस्थितत जाहीर प्रवेश

भुयेवाडीत गव्याला हाकलणाऱ्या तरुणावर हल्ला करताच तो जागीच ठार