जिल्‍हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी ..दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

कोल्‍हापूर : जिल्‍हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. शिवसेना विरुद्ध सर्व, असे चित्र स्‍पष्‍ट झाले आहे. त्यामुळे शिवसेनेचे पदाधिकारी खूपच आक्रमक असल्याचे पाहायला मिळत आहे.मात्र शिवसेनेतील फूटदेखील यानिमित्त स्‍पष्‍ट झाली आहे. शिवसेनेकडून मंत्री असलेले राजेंद्र पाटील यड्रावकर  व खासदार धैर्यशील माने  यांच्या मातोश्री माजी खासदार निवेदिता माने या सत्तारूढ आघाडीकडून उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. असे असताना शिवसेनेने तयार केलेल्या प्रचाराच्या बॅनरवर मात्र मंत्री यड्रावकर व खासदार माने यांचे फोटो असल्याने मतदारांमध्ये वेगवेगळी चर्चा सुरू आहे. 

जिल्‍हा बँकेची निवडणूक ऐनवेळी दुरंगी झाली आहे. मागील काही निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या छत्राखाली एकत्र काम करणारे काँग्रेस, राष्‍ट्रवादी, शिवसेना यांच्यात फाटाफूट झाली आहे. शिवसेना विरुद्ध सर्व अशी स्‍थिती आहे. काँग्रेस, राष्‍ट्रवादी सोबत भाजप आल्याने राज्यात एक नवीनच पॅटर्न पाहायला मिळत आहे. याचे पडसाद राज्याच्या राजकारणातही उमटण्याची शक्यता आहे. मात्र, शिवसेना विरोधात असली तरी त्यांच्यातही एकी राहिलेली नाही. शिवसेनेचे मंत्री यड्रावकर हे सत्ताधाऱ्यांसोबत कायम आहेत. तसेच खासदार माने यांच्या मातोश्री यांनीही सत्ताधारी आघाडीतून उमेदवारी घेताना शिवसेनेच्या विरोधात राहण्याची भूमिका घेतली आहे. या सर्वांवर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मेळावा घेऊन चांगलीच आगपाखड केली आहे.

शिवसेनेत पदे घेऊन सेनेलाच विरोध करणाऱ्यांना जाब विचारण्याचा इशारा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करण्याची भूमिकाही पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे हे नेते अडचणीत आले आहेत.

Comments

Popular posts from this blog

10 वीचे वर्ग मित्र व्हॉट्सॲप माध्यमातून 30 वर्ष एकमेकांपासून दुरावलेले मित्र एकत्र

रविराज जामकर व कार्यकर्ते यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मा.दौलतराव पाटील आण्णा यांच्या प्रमुख उपस्थितत जाहीर प्रवेश

भुयेवाडीत गव्याला हाकलणाऱ्या तरुणावर हल्ला करताच तो जागीच ठार