राधानगरी धरणाचा दरवाजा तांत्रिक काम सुरु असताना अडकला.

 राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाला ,

नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला 


दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

कोल्हापूर मधील राधानगरी धरणाचा तांत्रिक काम सुरु असताना अडकला. त्या मुळे राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे.या शिवाय नदीपात्रात हे पाणी सोडले जात असल्यामुळे, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.पाण्याचा विसर्ग वाढवल्यामुळे पंचगंगा नदीतील पाण्याची पातळी तीन ते चार फुट वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.राधानगरी धरणाचा दरवाजा अडकल्याने पाण्याचा विसर्ग वाढला आहे.त्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला असून, दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले आहे.त्यामुळे नागरिकांना न घाबरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज २९ डिसेंबरला सकाळी साडे आठच्या सुमारास राधानगरी धरणातील सर्व्हिस गेटचे काम सुरु होते. हे तांत्रिक काम सुरु असताना धरणाचा एक दरवाजा खाली घेण्याचे काम सुरु होते. यादरम्यान, राधानगरी धरणाचा दरवाजा अडकल्याने धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढला. या मोठ्या प्रमाणातील विसर्गामुळे पचगंगा नदीतील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.त्यामुळे नदीकाठाजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post