कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील दर्शनाच्या नियमांमध्ये बदल करण्यात आलादैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

 कोल्हापूर : कर्नाटकात ओमायक्रॉनचा दोन रूग्ण सापडल्यानंतर महाराष्ट्रातही सरकार आणि यंत्रणा सतर्क झाली आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील दर्शनाच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे भाविकांना आता तासाला 1500 ऐवजी केवळ 1200 जणांना मंदिरात प्रवेश मिळणार आहे. याच बरोबर कोरोना संसर्ग वाढल्यास 700 भाविकांनाच दर्शनासाठी पास दिले जातील, अशी माहिती देवस्थान समितीकडून देण्यात आली आहे. मंदिरा समोर भाविकांनी गर्दी करू नये असे आवाहनही देवस्थान समितीककडून करण्यात आले आहे.

घटस्थापनेपासून राज्यभरातली मंदिरे पुन्हा सुरु झाली. सुरुवातीला ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांना मंदिरात प्रवेशबंदी होती. मात्र सरकारनं हे निर्बंध शिथिल केल्यानंतर आता ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांना मंदिरात प्रवेश देण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच मंदिरात प्रवेश दिला जात आहे.

आता प्रत्येक भाविकाला दर्शन रांगेत चार ते पाच ठिकाणी सॅनिटायझर मारण्यात येऊन त्याचे तापमान तपासण्यात येत आहे . प्रत्येक भाविकाला मास्क शिवाय मंदिरात प्रवेश दिला जात नसून हजारोंच्या संख्येने भाविक असूनही सोशल डिस्टन्सचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवण्यात आलेली आहे. सध्या दर दोन तासांनी मंदिराची सफाई केली जात असून मंदिर प्रशासनाने सर्व प्रकारची खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे..

Comments

Popular posts from this blog

10 वीचे वर्ग मित्र व्हॉट्सॲप माध्यमातून 30 वर्ष एकमेकांपासून दुरावलेले मित्र एकत्र

रविराज जामकर व कार्यकर्ते यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मा.दौलतराव पाटील आण्णा यांच्या प्रमुख उपस्थितत जाहीर प्रवेश

भुयेवाडीत गव्याला हाकलणाऱ्या तरुणावर हल्ला करताच तो जागीच ठार