ज्या नगरसेवकांना 35 लाख रुपये दिले त्या नगरसेवकांची नावे आमदार विनय कोरे यांनी जाहीर करावी

 भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सेक्रेटरी सतीशचंद्र कांबळे


दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकी साठी ज्या नगरसेवकांना 35 लाख रुपये दिले त्या नगरसेवकांची नावे जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी जाहीर करावी अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सेक्रेटरी सतीशचंद्र कांबळे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.नगरसेवकांना देण्यासाठी आमदार कोरे यांनी कोठून रक्कम आणली याची ईडी मार्फत चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केले पत्रकार परिषदेस दिलीप पवार अनिल चव्हाण प्रशांत आंबे आरती रेडेकर दिलदार शेख आदी उपस्थित होते

काय म्हणाले होते विनय कोरे....

कोल्हापूर शहराचा महापौर आपल्या पक्षाचा असावा, यासाठी त्यावेळी नगरसेवकांना ३५-३५ लाख रुपये दिले. ईर्ष्येच्या राजकारणात भावनिक होऊन तो घेतलेला एक चुकीचा निर्णय होता, अशी कबुली आमदार विनय कोरे यांनी दिली. आता पुन्हा तीच चूक करायची काय..? सर्वसामान्यांना राजकारणाबद्दल आदर कमी होऊ नये तसेच कार्यकर्त्यांची राजकीय ईर्ष्या कमी करण्यासाठी जिल्ह्यातील निवडणुका बिनविरोध करण्याचा प्रयत्न असल्याचे कोरे म्हणाले.

गोकुळ दूध संघात सत्तांतर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतर जिल्हा परिषदेच्या राजकारणातही आ. कोरे यांची भूमिका महत्त्वाची ठरली. नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या टोकाच्या, ईर्ष्येच्या राजकारणात पालकमंत्री सतेज पाटील आणि माजी आमदार अमल महाडिक यांची निवडणूक बिनविरोध करण्यात आ. कोरे यांनी समन्वयकाची यशस्वी भूमिका बजावली होती. आता जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यात आ. कोरे हेच केंद्रबिंदू आहेत.

दरम्यान, वडगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत आवाडे, महाडिक, यड्रावकर, राजू शेट्टी, हाळवणकर गटाला एकाच व्यासपीठावर आणत बिनविरोध करण्याचा प्रयत्न आ. कोरे करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post