कानडी गुंडांना शिवसैनिक सळो की पळो केल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही

 - शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांचा इशारा..दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

बेळगाव येथे काल महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर शाई फेकून कानडी गुंडांनी जे कृत्य केले, हे निंदनीय असून इथून पुढे शिवसैनिक कानडी गुंडांना सळो की पळो केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी दिला. कर्नाटक सरकार व कानडी गुंडांचा शिवसेना कोल्हापूर जिल्हा यांच्यावतीने इचलकरंजी येथील शिवतीर्थ येथे तीव्र निषेध करण्यात आला. 

यावेळी "बेळगाव,बिदर,भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे", "बेळगाव आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं" अशा घोषणांनी शिवसैनिकांना परिसर दणाणून सोडला.हिंदुहृयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेला सीमाभाग हा महाराष्ट्राचाच भाग असून सिमावसियांचे शिवसेनेशी भावनिक नाते आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री मा.ना.उद्धवजी ठाकरे व महाराष्ट्रातील सर्व शिवसैनिक महाराष्ट्र एकीकरण समिती व सिमावसियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. वेळ पडल्यास कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम शिवसैनिक कर्नाटकात घुसून कानडी गुंडांची मस्ती जिरवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत, असा सज्जड दम जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी यावेळी दिला.

यावेळी उपजिल्हाप्रमुख महादेव गौड,साताप्पा भवान,तालुकाप्रमुख आनंदा शेट्टी,इचलकरंजी शहरप्रमुख सयाजी चव्हाण,युवासेना जिल्हा युवाधिकारी शिवाजी पाटील,माजी शहरप्रमुख धनाजी मोरे,मलकारी  लवटे,संजय पाटील,भरत शिवलिंगे,मनोज भाट,गणेश झंगटे,दत्ता साळुंखे,सौ.शोभा गोरे,सागर जाधव,अभिजीत लोले यांच्यासह शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post