शिवसेनेला बँकेतील सत्ताधाऱयांनी सन्मानाने वाटा द्यावा

अन्यथा स्वतंत्र पॅनेल करून स्वबळावर निवडणूक लढवू..अरुण दुधवडकर 


दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला बँकेतील सत्ताधाऱयांनी सन्मानाने वाटा द्यावा; अन्यथा स्वतंत्र पॅनेल करून स्वबळावर निवडणूक लढवू, असा इशारा कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी दिला आहे.जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे इच्छुक उमेदवार आणि पदाधिकाऱयांची आज शासकीय विश्रामगृह येथे बैठक झाली. तत्पूर्वी संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर तसेच खासदार संजय मंडलिक यांनी पत्रकार परिषदेत शिवसेना ताकदीने ही निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले.

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असून, जिल्ह्यात पदवीधर, शिक्षक मतदारसंघासह गोकुळ दूध संघासाठी झालेल्या निवडणुकीसह नुकत्याच बिनविरोध झालेल्या विधानपरिषद निवडणुकीसाठीही शिवसेनेने महाविकास आघाडी म्हणून साथ दिली आहे. त्यामुळे आताही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेला सन्मानाने जागा मिळायला हव्यात.

यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना नेते, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याशी चर्चा झाली आहे. महाविकास आघाडीचे जिल्ह्यातील नेते ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्हा बँकेत सन्मानाने जागा द्याव्यात; अन्यथा शिवसेना स्वबळावर ही निवडणूक लढवेल, असा इशारा अरुण दुधवडकर यांच्यासह सहसंपर्कप्रमुख व खासदार संजय मंडलिक यांनी दिला.

यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव, प्रदीप खोपडे, आमदार प्रकाश आबिटकर, संग्राम कुपेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. परिवहनमंत्री अनिल परब यांनी शनिवारी शिर्डीत येऊन साईदरबारी मध्यान्ह आरतीला हजेरी लावली. श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी मंत्री परब यांचा सत्कार केला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे उपस्थित होते. यावेळी संपकरी एसटी कर्मचाऱयांनी पुन्हा कामावर परतावे, अशी प्रार्थना साईचरणी केल्याचे मंत्री परब यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post