कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकीत आज अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी नाट्यपूर्ण घडामोडी

 दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकीत आज अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी नाट्यपूर्ण घडामोडी नंतर सत्तारुढ गटाने उमेदवारी नाकारलेल्या विद्यमान संचालिका उदयानी साळुंखे व संचालक पी. जी. शिंदे यांच्या पत्नी सौ.लतिका यांनी शिवसेनेचा रस्ता धरला. शिवसेनेकडून या दोघींना महिला प्रतिनिधी गटाकडून उमेदवारी जाहिर केली.

दरम्यान, या निवडणूकीत शिवेसेनेच्या नेतृत्वाखाली समविचारी पक्षाचे स्वतंत्र्य पॅनेल तयार होत असताना शिवेसेनेचे खासदार धैर्यशील माने यांच्या मातोश्री माजी खासदार श्रीमती निवेदिता माने मात्र शिवसेनेला सोडून सत्तारुढ गटाची उमेदवारी स्वीकारली.

या निवडणूकीत महिला प्रतिनिधी गटातून सत्तारुढ गटाकडून श्रीमती माने यांचे नाव निश्‍चित होते; याच गटातून दुसऱ्या जागेवर कुणाला घ्यायचे या बाबत गेले दोन दिवस कात्याकुट सुरु होता. काल रात्री शिवसेना आणि सत्तारुढ गटाची चर्चा फिसकटल्यानंतर या गटातील शिवसेनेची जागा रिक्त सोडून दुसऱ्या जागेवर कॉंग्रेसकडून रुतिका काटकर यांची उमेवारी जाहिर करण्यात आली. त्यामुळे श्रीमती साळुंखे यांचा पत्ता कट झाला. त्याचप्रमाणे गगनबावडा तालुका विकास संस्था गटाकडून विद्यमान संचालक पी. जी. शिंदे यांनी स्वत:चा अर्ज न भरता महिला प्रतिनिधी गटाकडून पत्नी सौ. लतिका यांचा अर्ज दाखल केला होता. सत्तारुढ गटाने त्यांनाही डावलल्याने त्यांनी शिवसेनेचा मार्ग धरत उमेदवारी स्वीकारली.

Post a Comment

Previous Post Next Post