राज्यभरातील भाविकांनी दर्शनासाठी जोतिबा डोंगर गाठला.परिणामी, डोंगर हाउसफुल्लदैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

जोतिबा डोंगर : नाताळची सुटी तसेच कोरोनानंतर येणाऱ्या ओमिक्रॉनच्या धास्तीमुळे आज राज्यभरातील भाविकांनी दर्शनासाठी जोतिबा डोंगर गाठला.परिणामी, डोंगर हाउसफुल्ल झाल्याचे चित्र होते. दिवसभरात दीड लाख भाविक डोंगरावर आले. मिनी चैत्र यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. गर्दीमुळे दोन किलोमीटर अंतरापर्यंत दर्शन रांग लागली. लॉकडाउन झाल्यावर देवाचे दर्शन घेता येणार नाही या भीतीने आज भाविक सहपरिवार डोंगरावर दाखल झाले. गर्दी मुळे यंत्रणेवर मोठा ताण पडला.

भाविकांचे प्रचंड हाल झाले. मंदिरात पहाटे घंटानादानंतर धार्मिक विधीस प्रारंभ झाला. पाद्यपूजा, काकड आरती मुखमार्जन झाले. त्यानंतर अभिषेक विधी झाला. श्रीची सरदारी महापूजा बांधण्यात आली होती. पहाटेपासूनच डोंगर गर्दीने फुलून गेला होता. रात्री पालखी सोहळा झाला. पालखीवर गुलाल खोबऱ्याची उधळण झाली. 'चांगभलं'च्या जयघोषाने मंदिर परिसर दणाणून गेला होता.दिवसभर उन्हाचा तडाखा होता. उन्हात उभे राहून सर्रास भाविकांनी दर्शनाचा आनंद लुटला. ठाकरे मिटके गल्लीतून एसटी बसस्थानकापर्यंत दर्शन रांग लागली. मंदिर परिसर, सेंट्रल प्लाझा, यमाई मंदिर व बाग या ठिकाणी भाविकांनी विसावा घेतल्याचे चित्र होते. डोंगरावर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. बहुतांश भाविकांकडे मास्क नव्हते. कोडोली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतलकुमार डोईजड यांच्या मार्गदर्शनाखालीबंदोबस्त होता.

Comments

Popular posts from this blog

10 वीचे वर्ग मित्र व्हॉट्सॲप माध्यमातून 30 वर्ष एकमेकांपासून दुरावलेले मित्र एकत्र

रविराज जामकर व कार्यकर्ते यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मा.दौलतराव पाटील आण्णा यांच्या प्रमुख उपस्थितत जाहीर प्रवेश

भुयेवाडीत गव्याला हाकलणाऱ्या तरुणावर हल्ला करताच तो जागीच ठार