: घरी खेळण्यासाठी आलेल्या नात समान तीन वर्षाच्या चिमुरडीवर

 लैगिक अत्याचार करणाऱ्या ५१ वयाच्या यशवंत बापू नलवडे  या नराधमास मरे पर्यत जन्मठेपेची शिक्षा सुनावली..


दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

कोल्हापूर : घरी खेळण्यासाठी आलेल्या नात समान तीन वर्षाच्या चिमुरडीवर लैगिक अत्याचार करणाऱ्या ५१ वयाच्या यशवंत बापू नलवडे (रा.सावे, ता. शाहुवाडी) या नराधमास जिल्हा व सत्र न्यायाधिश व्ही. व्ही. जोशी यांनी मरेपर्यत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

बालिकेवरील अमानुष अत्याचार खटल्यात सरकारी अभियोक्ता ॲड. मंजुषा बी. पाटील यांनी काम पाहिले. नात-आजोबा या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेच्या निकालाकडे शाहुवाडी तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहीले होते.

खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी, आरोपी यशवंत नलवडे याच्या नातवंडासोबत खेळण्यासाठी पीडित चिमुरडी नेहमी येत होती. त्यावेळी नराधाम नलवडे याने पिडीत बालिकेवर घरातच अमानुष अत्याचार केले. त्याने बालिकेच्या अंगावर विवीध ठिकाणी चावे घेऊन तिला जखमी केले. तिच्या अंगावरील कपडे रक्ताने माखल्यामुळे तिच्या आईने चौकशी केली असता बालिकेने घडला प्रकार सांगितला.

पिडीत मुलीच्या आईने शाहुवाडी पोलिसात तक्रार दिली. तेथील तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक सरोजिनी चव्हाण (सद्या. इस्पुर्ली पोलीस) यांनी पोक्सो कलमांतर्गत नराधामास अटक केली. खटल्यात एकूण १९ साक्षीदार तपासले. भक्कम साक्षी व पुरावा तसेच सरकारी वकील मंजुषा पाटील यांचा युक्तीवाद ग्राह्य मानून आरोपीस मरेपर्यत जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

Post a Comment

Previous Post Next Post