साखर कारखानदारांच्या विजयासाठी मंत्री, आमदार, खासदार यांची प्रतिष्ठा पणालादैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

कोल्हापूर : जिल्हा बँकेची निवडणूक लागलेल्या १५ पैकी सात जागांवर साखर कारखान्यांशी संबंधित उमेदवार नशीब आजमावत असून ज्या सहा जागा बिनिविरोध झाल्या त्यापैकी पाच उमेदवारही साखर कारखान्याशी संबंधित आहेत.रिंगणात राहिलेल्या साखर कारखानदारांच्या विजयासाठी मंत्री, आमदार, खासदार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

जिल्हा बँकेच्या संचालक पदाच्या २१ जागांसाठी ५ जून रोजी मतदान होत आहे. यापैकी सहा जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित १५ जागांची निवडणूक लागली आहे. रिंगणात असलेल्या साखर कारखानदारांपैकी चार कारखानदार सत्तारूढ गटाचे तर तिघे जण विरोधी आघाडीचे उमेदवार आहेत. बिनविरोध झालेल्यांमध्‍ये ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, राजेश पाटील, माजी आमदार अमल महाडिक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांचा समावेश आहे. हे सर्वजण सध्‍या सत्तारूढ आघाडीचे असे समजले जातात.

साखर कारखानदारांबरोबरच तीन मंत्र्यांनाही जिल्हा बँकेत जावे असे वाटते, यापैकी दोन मंत्री बिनविरोध झाले असून एका मंत्र्यांसमोर 'दत्त-शिरोळ'चे अध्यक्ष गणपतराव पाटील यांचे तगडे आव्हान आहे. रिंगणात असलेल्या अन्य साखर कारखानदारांत श्री. पाटील यांच्यासह खासदार प्रा. संजय मंडलिक, आमदार विनय कोरे, प्रकाश आवाडे, रणवीरसिंह गायकवाड यांचा समावेश आहे.

बिनविरोध साखर कारखानदार

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ-सरसेनापती घोरपडे कारखाना
पालकमंत्री सतेज पाटील- डी. वाय. पाटील कारखाना
पी. एन. पाटील-भोगावती कारखाना
अमल महाडिक - राजाराम कारखाना
ए. वाय. पाटील- बिद्री कारखाना

रिंगणातील कारखानदार

राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर - शरद-नरंदे
खासदार प्रा. संजय मंडलिक - मंडलिक-हमीदवाडा
विनय कोरे- वारणा
आमदार प्रकाश आवाडे - जवाहर कारखाना
अशोक चराटी - आजरा साखर कारखाना
रणवीर गायकवाड - उदयसिंगराव गायकवाड
गणपतराव पाटील- 'दत्त-शिरोळ'

Comments

Popular posts from this blog

10 वीचे वर्ग मित्र व्हॉट्सॲप माध्यमातून 30 वर्ष एकमेकांपासून दुरावलेले मित्र एकत्र

रविराज जामकर व कार्यकर्ते यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मा.दौलतराव पाटील आण्णा यांच्या प्रमुख उपस्थितत जाहीर प्रवेश

भुयेवाडीत गव्याला हाकलणाऱ्या तरुणावर हल्ला करताच तो जागीच ठार