टेलिकॉम कंपन्या प्रीपेडनंतर लवकरच पोस्टपेड ग्राहकांना झटका देऊ शकतात.

 


दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

टेलिकॉम कंपन्या प्रीपेडनंतर लवकरच पोस्टपेड ग्राहकांना झटका देऊ शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती एअरटेल आणि वोडाफोन- आयडिया त्यांचे पोस्टपेड प्लॅनचे दर वाढवण्याची शक्यता आहे.यापूर्वी, एअरटेलने जुलैमध्ये पोस्टपेड ग्राहकांसाठी शुल्क वाढवले ​​होते. यासोबतच फॅमिली प्लॅनमध्येही बदल करण्यात आले आहेत.तर दुसरीकडे दिग्गज टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओबद्दल (Reliance Jio) सांगायचं झाल्यास एअरटेल (Airtel) आणि व्होडाफोन-आयडिया (Vodafone-Idea) नंतर, या महिन्यात १ डिसेंबरपासून त्यांचे प्रीपेड प्लॅन महाग झाले आहेत.


तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार टेलिकॉम कंपन्या पोस्टपेड टॅरिफमध्ये जितका उशीर करतील, तितका कंपन्यांना अधिक तोटा होईल. जर Airtel आणि Vodafone Idea ने ग्राहकांसाठी पोस्टपेड प्लॅन्स महाग केले तरी ग्राहकांसाठी ब्रँड प्राधान्य, उत्तम अनुभव अधिक महत्त्वाचा असल्याने ते इतरत्र कुठेही जाण्याची शक्यता नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

भारतात सर्वात स्वस्त प्लॅन्स

अलिकडच्या काळात कंपन्यांनी प्रीपेड प्लॅनच्या दरात वाढ केल्यानंतरही भारतातील टेलिकॉप कंपन्यांच्या प्लॅन्सचे दर जगभरातील सर्वात स्वस्त आहेत. Bharti Airtel आणि Vodafone Idea ने आधीच बाजारात त्यांची मजबूत स्थिती राखण्यासाठी ARPU (एव्हरेज रियलायझेशन पर युझर) ३०० रुपयांपर्यंत नेण्याचे संकेत दिले आहेत. त्याच वेळी, आता ARPU सुमारे १३० रुपये आहे, जे पाच वर्षांपूर्वी २०० रुपयांपेक्षा जास्त होता.

अशातच कंपन्यांनी सुरुवातीला २०० रुपयांपर्यंत ARPU नेण्याचे लक्ष्य ठेवले आहे. व्होडाफोन आयडियाचा ARPU सध्या १०९ रुपये आणि एअरटेलचा ARPU १५३ रुपये आणि रिलायन्स जिओचा ARPU १४३.६ रुपये इतका आहे.

Comments

Popular posts from this blog

10 वीचे वर्ग मित्र व्हॉट्सॲप माध्यमातून 30 वर्ष एकमेकांपासून दुरावलेले मित्र एकत्र

रविराज जामकर व कार्यकर्ते यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मा.दौलतराव पाटील आण्णा यांच्या प्रमुख उपस्थितत जाहीर प्रवेश

भुयेवाडीत गव्याला हाकलणाऱ्या तरुणावर हल्ला करताच तो जागीच ठार