पाच वर्षांत पैसे दुप्पट करून देतो असे सांगून 100 हून महिलांचे पैसे घेऊन दांपत्य पसार

पसार झालेल्या त्या दांपत्याचा दिंडोशी पोलीस शोध घेत आहेत.

दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

 पाच वर्षांत पैसे दुप्पट करून देतो असे सांगून 100 हून महिलांचे पैसे घेऊन दांपत्य पसार झाल्याची घटना गोरेगाव परिसरात घडली. घडल्याप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी एका दांपत्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.पैसे घेऊन पसार झालेल्या त्या दांपत्याचा दिंडोशी पोलीस शोध घेत आहेत.

तक्रारदार या गृहिणी असून त्या गोरेगाव परिसरात राहतात. दोन वर्षांपूर्वी फरार महिलेने तक्रारदार यांना संपर्क केला. आपल्या दोन कंपन्या आहेत. त्या कंपनीमध्ये दर महिन्याला 700 रुपये गुंतवल्यास पाच वर्षांनी 50 हजार रुपये दिले जातील असे तक्रारदार यांना सांगण्यात आले. त्यावर विश्वास ठेवून महिलेने 41 हजार रुपये आणि तिच्या सासूने सहा लाख रुपये त्या कंपनीत गुंतवले.

काही दिवसांपूर्वी तक्रारदार यांनी फरार महिलेला त्या गुंतवणुकीबाबत विचारणा केली. तेव्हा ती पैसे देण्यास टाळाटाळ करू लागली. तसेच आणखी एका व्यक्तीची या दांपत्याने पोस्टात गुंतवणुकीच्या नावाखाली दीड लाखाची फसवणूक केली. गुंतवणूकदार हे पैशाबाबत विचारणा केल्यावर त्या दांपत्याने गोरेगाव येथील घर सोडून पळ काढला. फसवणूक झालेल्या त्या दोघांनी परिमंडळ-12 चे पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे याची भेट घेऊन घडल्या प्रकाराची माहिती दिली. महिलेच्या तक्रारीची दखल घेत दिंडोशी पोलिसांनी त्या दांपत्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Comments

Popular posts from this blog

10 वीचे वर्ग मित्र व्हॉट्सॲप माध्यमातून 30 वर्ष एकमेकांपासून दुरावलेले मित्र एकत्र

रविराज जामकर व कार्यकर्ते यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मा.दौलतराव पाटील आण्णा यांच्या प्रमुख उपस्थितत जाहीर प्रवेश

भुयेवाडीत गव्याला हाकलणाऱ्या तरुणावर हल्ला करताच तो जागीच ठार