11 हजार 363 गोरगरीबांच्या घरात 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजने'तून विजेचा लखलखाटदैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

 ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील 11 हजार 363 गोरगरीबांच्या घरात 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजने'तून विजेचा लखलखाट झाला आहे. 14 एप्रिलपासून ही योजना सुरू झाली असून महावितरणने अवघ्या नऊ महिन्यांत या नवीन वीज जोडण्या दिल्या आहेत

राज्याच्या कानाकोपऱ्यात वीज पोहचली असली तरी आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने ग्रामीण भागातील अनेक घरांमध्ये अद्याप वीज पोहचलेली नाही. याची दखल घेत ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या निर्देशानुसार, महावितरणने 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना' सुरू केली आहे. त्यानुसार आतापर्यंत 11 हजारांहून अधिक वीज कनेक्शन दिले असून 1 हजार 691 ग्राहकांनी त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर 15 दिवसांत वीज जोडणी दिली जाणार आहे.
.

Post a Comment

Previous Post Next Post