मनसेच्या वतीनेजिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या नेतृत्वात 19 डिसेंबर रोजी स्थानिक बसस्थानकासमोर तीव्र निदर्शने व धरणे आंदोलन राबविण्यात आले.

 


दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

राज्य शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या दीड महिन्यापासून सुरु असलेल्या एस.टी. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या पुर्ततेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या नेतृत्वात 19 डिसेंबर रोजी स्थानिक बसस्थानकासमोर तीव्र निदर्शने व धरणे आंदोलन राबविण्यात आले. शासनाने कामगारांच्या मागण्या मान्य न केल्यास भव्य मुक मोर्चा काढण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांनी एसटी प्रशासनाला दिलेल्या निवेदनाव्दारे दिला आहे. अर्धनग्न मोर्चाची परवानगी नाकारल्यामुळे धरणे आंदोलन राबविण्यात आले होते. यावेळी आगार प्रमुखांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, एस. टी. कर्मचार्यांच्या विलीनीकरणासह इतर मागण्यांसाठी गेल्या दीड महिन्यापासून संप असून, या संपा दरम्यान शासनाने कित्येक कर्मचार्यांना सेवेतून निलंबित केले आहे.

एसटी कर्मचारी संघटनाच्या मागण्यांसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला संपूर्ण पाठींबा जाहीर केला असून मनसेच्या वतीने राज्यात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या नेतृत्वात काळ्या पट्ट्या बांधून, जिल्हाधिकारी कार्यालयावर ढोले, डफडे वाजून शासनाचे लक्ष वेधले आहे. परंतु शासनाने मनसेच्या आंदोलनाची अद्याप दखल घेतली नाही. त्यामुळे एस. टी. कर्मचार्यांच्या मागण्यांची त्वरित पूर्तता करून एस. टी. सेवा पुर्ववत सुरु करावी अशी मनसेची मागणी आहे. शासनाने कामगारांना न्याय न दिल्यास यापुढे भव्य मुक मोर्चा काढण्यात येईल असा इशाना मनसेच्या वतीने देण्यात आला आहे. या आंदोलनात महाराष्ट्र सैनिक कृष्णा इंगळे, मोहन कोल्हे, गजानन वैरागडे, मनोज राऊत, यश चव्हाण, पवन डुबे, प्रतिक कांबळे, प्रकाश कवडे, रघुनाथ खुपसे, योगेश भोयर, विनोद सावके, उमेश टोलमारे, नितेश खडसे, शिवराज टोलमारे, महिला सेनेच्या सौ. बेबी धुळधुळे, सिता धंदरे, वंदना अक्कर, वनिता पांडे यांच्यासह एसटी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Post a Comment

Previous Post Next Post