मांजरा सारखा म्याव म्याव आवाज काढणारे आज मांजरा सारखे लपून बसलेत'.

 


दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

मुंबई - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्यानंतर भाजपा आमदार नितेश राणे यांची कणकवली पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. त्यानंतर संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला करणारा मुख्य आरोपी सचिन सातपुते याला सिंधुदुर्ग पोलिसांनी दिल्लीहून अटक केली आहे.सचिन सातपुतेच्या चौकशी नंतर शिवसेनेने नितेश राणे यांनाही अटक करण्याची मागणी आक्रमकपणे लावून धरली आहे. यावरून शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी नितेश राणे यांना टोला लगावला आहे.

ते म्हणाले,'जो व्यक्ती दुसऱ्यासोबत वाईट वागतो त्याला नेहमीच देव शिक्षा देतो. जे गुन्हेगार असतात ते सर्वात जास्त पोलिसांना घाबरतात. प्रत्येक गुन्हेगार कायदा आणि पोलिसांना घाबरत असतो. कोणी गुन्हा केला हे मला माहिती नाही. मात्र जे दुसऱ्यांना चिडवतात तशीच परिस्थती दैव त्यांच्यावर आणतं असतो. त्यामुळे आपलं वागणं चांगलं ठेवलं पाहिजे.'

ते पुढे म्हणाले,'मांजरा सारखा म्याव म्याव आवाज काढणारे आज मांजरा सारखे लपून बसलेत'असं म्हणत त्यांनी राणेंवर टोला लगावला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post