आज मराठा क्रांती मोर्चा राज्यभर निदर्शने करण्याची शक्यता

 


दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

आज मराठा क्रांती मोर्चा राज्यभर निदर्शने करण्याची शक्यता आहे. कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा व्हिडिओ शुक्रवारी रात्री व्हायरल झालेला.विटंबना केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी रस्त्यावर उतरले आणि त्यांनी कानडी व्यावसायिकांची दुकाने बंद करण्यास सुरुवात केली होती. या वादावर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया देत, छत्रपतींच्या पुतळ्याची विटंबना ही छोटी गोष्ट आहे. अशा अर्थाचं विधान केल्यानं वातावरण आणखीनच तापलं.

आज कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी शिवरायांच्या पुतळ्याजवळ जाऊन माफी मागितली नाही तर कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या गाड्या अडवल्या जातील. तसेच आज राज्यभर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आलाय

Post a Comment

Previous Post Next Post