केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा वाढदिवस

 रिपब्लिकन पक्षा तर्फे  संघर्षदिन म्हणून देशभर साजरा होणार - कृष्णमिलन शुक्लादैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

मुंबई दि 21 - रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांचा वाढदिवस रिपाइं तर्फे दरवर्षी 25 डिसेंबरला  संघर्षदिन म्हणून साजरा होतो.यंदाही संघर्षनायक ना.रामदास आठवले  यांचा वाढदिवस दि.25 डिसेंबर रोजी  रिपब्लिकन पक्षा तर्फे देशभर संघर्षदिन म्हणून साजरा होणार असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कृष्णमिलन शुक्ला यांनी दिली.

 केंद्रियराज्यमंत्री ना.रामदास आठवले  यांचा जीवनप्रवास हा संघर्षमय राहिला आहे. संघर्षाचे दुसरे नाव रामदास आठवले आहे.त्यामुळे दलित शोषित पीडित वर्गासोबत सर्व जाती धर्मीयांमधील गरीबांना बहुजनांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत  संघर्षशील राहणारे लोकनेते रामदास आठवले यांना आंबेडकरी जनता  संघर्षनायक मानते.त्यामुळे आपल्या संघर्षनायक नेत्याचा जन्मदिन दरवर्षी  संघर्षदिन म्हणून साजरा केला जातो.महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष देशभर मजबुतीने पोहोचविण्याचे काम संघर्षनायक रामदास आठवले करीत असून त्यांचा वाढदिवस संघर्षदिन म्हणून देशभर साजरा करताना गरीब सर्वसामान्य जनतेला मदत वाटप; थंडीत संरक्षण म्हणून चादर वाटप; चष्मा वाटप;अन्नधान्य वाटप; आरोग्य शिबीर; रुग्णायलयांत फळवाटप;  बिस्कीट वाटप असेविविध  कार्यक्रम देशभर स्वयंस्फूर्तीने रिपब्लिकन कार्यकर्ते आयोजित करीत असतात. यंदा या सर्व कार्यक्रमांबरोबर मुंबईतील प्रत्येक तालुक्यात रिपब्लिकन पक्षातर्फे रक्तदान शिबिर आयोजित करून संघर्षदिन साजरा करण्यात येणार असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कृष्णमिलन शुक्ला यांनी दिली आहे.           

Comments

Popular posts from this blog

10 वीचे वर्ग मित्र व्हॉट्सॲप माध्यमातून 30 वर्ष एकमेकांपासून दुरावलेले मित्र एकत्र

रविराज जामकर व कार्यकर्ते यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मा.दौलतराव पाटील आण्णा यांच्या प्रमुख उपस्थितत जाहीर प्रवेश

भुयेवाडीत गव्याला हाकलणाऱ्या तरुणावर हल्ला करताच तो जागीच ठार