केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रपती; पंतप्रधान यांच्या सह अनेक मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव

संघर्षनायक रामदास आठवले यांचा वाढदिवस रिपाइं तर्फे  देशभर  संघर्षदिन म्हणून साजरा


दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

  मुंबई दि. 25 - रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री संघर्षनायक  ना. रामदास आठवले यांचा वाढदिवस रिपाइं तर्फे देशभर संघर्षदिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला.   ना.रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रपती महामहिम  रामनाथ कोविंद यांनी पत्र पाठवून ना.आठवलेंचे अभिष्टचिंतन केले आहे.तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ना.रामदास आठवले यांना शुभेच्छा पत्र पाठवून अभिष्टचिंतन करताना ना रामदास आठवले यांच्या नेतृत्वात देश विकासाची  नवी  उंची गाठेल असा गौरवपूर्ण  शुभसंदेश दिला आहे.ना.रामदास आठवले यांना उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू; लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला;  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ;केंद्रीय मंत्री नितीन गडकरी; केंद्रीय मंत्री नारायण राणे;केंद्रीय राज्यमंत्री डॉ भागवत कराड; केंद्रियराज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील;फग्गन सिंह कुलस्ते; केंद्रियराज्यमंत्री प्रतिमा भौमिक; जनरल व्ही के सिंह;डॉ एल मुरुगण; महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस; राजस्थान च्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया   आदी अनेक मान्यवरांनी ना रामदास आठवले यांच्यावर  वाढदिवसानीमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त  रिपब्लिकन पक्षातर्फे मुंबईत मुलुंड; अंधेरी ;घाटकोपर ;चेंबूर आदी अनेक ठिकाणी रिपाइं चे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर; मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे  राष्ट्रीय उपाध्यक्ष कृष्णमिलन शुक्ला; ;रतन अस्वारे आदींच्या पुढाकारातून गरिबांना ब्लॅंकेट; चादर वाटप; करण्यात आले.महाराष्ट्रात भुपेश थुलकर;  राजा सरवदे यांच्या नेतृत्वात अनेक ठिकाणी रक्तदान शिबिर; रुग्णालयात फळवाटप; पुण्यात चाकण येथे सचिन वाघमारे यांच्या नेतृत्वात अनेक लोकपोयोगी उपक्रम राबवून संघर्षनायक ना.रामदास आठवले यांचा वाढदिवस संघर्षदिन म्हणून साजरा करण्यात आला.


               

            

Post a Comment

Previous Post Next Post