अभिनेता सलमान खानला सर्पदंश ,

सध्या सलमानची प्रकृती चांगली असल्याची माहिती देण्यात आली आहे.


दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा ;

 ख्रिसमस आणि नववर्षांच्या सेलिब्रेशनसाठी पनवेल येथील फार्म हाऊसवर गेलेल्या अभिनेता सलमान खान सोबत मोठी घटना घडली. सलमान खान शनिवारी मध्यरात्री सर्पाने दंश केल्याची माहिती समोर आली.फार्म हाऊस मध्येच ही घटना घडली असून, त्यानंतर सलमान खानला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सध्या सलमानची प्रकृती चांगली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

अभिनेता सलमान खान शनिवारी पनवेलमधील त्याच्या फार्म हाऊस होता. मध्यरात्री फार्म हाऊसमध्ये त्याला सापाने चावा घेतला. सलमान खानला दंश करणारा साप विषारी नसल्याने मोठी भीती दूर झाली. मात्र, त्यानंतर तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं.

सलमान खानला नवी मुंबईतील कामोठे परिसरात असलेल्या एमजीएम रुग्णालयात मध्यरात्री दाखल करण्यात आलं. सलमानवर डॉक्टरांनी तातडीने उपचार केले. त्यानंतर आता सलमान खानची प्रकृती व्यवस्थित असल्याची माहिती देण्यात आली आहे.मध्यरात्री 3 वाजता सलमान खानला एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचार केल्यानंतर त्याला रुग्णालयातून सुटी देण्यात आली असून, सकाळी 9 वाजता सलमान खान पुन्हा पनवेलमधील फार्म हाऊसवर परतला. सध्या तो विश्रांती घेत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post