अशी प्रतिक्रिया बाळा नांदगावकर यांनी दिलीदैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

 मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरें सोबत सावली प्रमाणे असणारे नेते बाळा नांदगावकर हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.त्यामुळे आता राज ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का बसणार का अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

नांदगावकर हे राज ठाकरेंचे अत्यंत विश्वासू सहकारी आहेत. त्यामुळे सुरु असलेल्या या चर्चांबाबत एका माध्यमाशी बोलताना त्यांनी या प्रकरणी भाष्य केले आहे. पुण्याच्या दौऱ्याला गेलो नसल्याने बाळा नांदगावकर स्वगृही परतणार अशा बातम्या आणि काही मेसेज फिरत आहेत अशी प्रतिक्रिया बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.

राज ठाकरे यांचा नाशिक, औरंगाबाद आणि पुणे दौरा सुरू आहे. नाशिक आणि औरंगाबाद दौऱ्यादरम्यान मी राज ठाकरे यांच्या सोबत होतो. पुण्याला जेव्हा राज ठाकरे आले तेव्हा मी मुंबईला परतलो. मुंबईत माझ्या मतदार संघात कार्यालयाचे उदघाटन साहेबांच्या हस्ते असल्याने मी तयारीसाठी मुंबईत आलो आहे. मी पुण्याच्या दौऱ्याला गेलो नसल्याने बाळा नांदगावकर स्वगृही परतणार अशा बातम्या आणि काही मेसेज फिरत आहेत, अशी प्रतिक्रिया बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post