देवेंद्र फडणवीस यांनी,१५ लाखां बाबत नरेंद्र मोदी कधीच बोलले नाहीत...

काँग्रेसचे नेते सत्यजीत तांबे यांनी पुराव्यासह फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं .. हा घ्या पुरावा..


दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

 मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्तधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळाले आहे. यावेळी शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केली.१५ लाखांच्या विधानावरून जाधव यांनी मोदींच्या आश्वासनाची आठवण करून दिली. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

सभागृहात चर्चा सुरु असताना नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या 15 लाखांच्या आश्वासनाचा मुद्दा उपस्थित झाला. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी, नरेंद्र मोदी कधीच असे बोलले नाही, असा दावा केला. यावरून उर्जामंत्री नितीन राऊत यांनी फडणवीसांनी मोदींनी केलेल्या वक्तव्याबद्दल सांगितलं. तर काँग्रेसचे नेते सत्यजीत तांबे यांनी पुराव्यासह फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे.

सत्यजीत तांबे यांनी एक व्हिडीओ शेअर करत फडणवीसांचा दावा खोडून काढला आहे. या व्हिडीओ मध्ये देवेंद्र फडणवीसांचं सभागृतील वक्तव्य दिसतं. त्यानंतर मोदींचा १५ लाखांबाबत आणि परदेशातील काळ्या पैशांबाबतचं भाषण दिसतं.

Post a Comment

Previous Post Next Post