वर्ष अखेरीस आयोजित कार्यक्रमां मध्ये सहायक आयुक्तांच्या लिखित परवानगी बंधनकारकदैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

 वर्ष अखेरीस आयोजित कार्यक्रमांमध्ये 200 माणसे जमणार असतील तर संबंधित वॉर्डच्या सहायक आयुक्तांच्या लिखित परवानगी सह जमणाऱ्या माणसांमध्ये सहा फुटांचे अंतर राखणे बंधनकारक राहणार आहे.पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी याबाबत सुधारित नियमावली जाहीर केली आहे. तसेच या गर्दीवरही पालिकेचे अधिकारी, पोलिसांचा वॉच राहणार असून नियम मोडल्यास कारवाई केली जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंबईत कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात असली तरी दक्षिण आफ्रिकेसह युरोपीय देशांमध्ये वाढलेल्या कोरोना व्हेरिएंट ओमायक्रोनमुळे मुंबईचेही टेन्शन वाढले आहे. मुंबईत 20 डिसेंबरपर्यंत ओमायक्रोनचे 23 रुग्ण आढळले आहेत. ओमायक्रोन डेल्टापेक्षा घातक नसल्याचे आरोग्यतज्ञांकडून सांगण्यात येत असले तरी रुग्णसंख्या वाढल्यास आरोग्य यंत्रणेवर ताण येण्याची भीती आहे. त्यामुळे पालिकेकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. यामध्ये वर्षअखेरचे कार्यक्रम, लग्न सोहळ्यांमध्ये होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेने कठोर नियमावली जाहीर केली आहे.

दोन डोस बंधनकारकच

ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर पालिकेने थर्टी फर्स्ट पिंवा कोणत्याही कार्यक्रमांत सहभागी होणाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेणे बंधनकारक असल्याचे याआधीच जाहीर झाले आहे . शिवाय नववर्ष स्वागत घरातूनच करावे , असे आवाहन करतानाच माणसे एकत्र येणाऱ्या कार्यक्रमात कोरोना खबरदारीचे नियम पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे .

असे आहेत नवे नियम

पाटर्य़ा, कार्यक्रम, लग्नसोहळे, मीटिंग, शिबिरे किंवा कुठल्याही कार्यक्रमांना बंदिस्त जागेत असल्यास 50 टक्के उपस्थिती राहील.

या ठिकाणी मास्क, सॅनिटायझेशनची व्यवस्था असावी. जमणाऱ्या माणसांमध्ये सहा फुटांचे अंतर असावे.

मोकळ्या जागेत होणाऱ्या कार्यक्रमांसाठी 25 टक्के उपस्थिती आणि माणसांमध्ये सहा फुटांचे अंतर असावे.

आयोजित कार्यक्रमांवर वॉर्ड स्तरावर अधिकारी नजर ठेवतील. शिवाय पोलिसांचीही नजर राहील.

कोणत्याही कार्यक्रमात कोविड खबरदारीचे नियम मोडल्याचे दिसल्यास साथरोग नियंत्रण कायद्यानुसार कारवाई.

Post a Comment

Previous Post Next Post