समुद्र किनारा स्वच्छता मोहिमे साठी मनसेने एक पाऊल पुढे टाकले.

 विविध संघटनानी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.

दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

मुंबई- समुद्र किनारा स्वच्छता मोहिमे साठी मनसेने एक पाऊल पुढे टाकले असून आज सकाळी अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली दादर चौपाटी पासून स्वच्छता मोहिमेला सुरुवात करण्यात आली.यावेळी शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे, मनसेचे माहीम विधानसभा विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्यासह विविध संघटनानी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला होता.

मुंबईतील काही ठिकाणातील समुद्राची अवस्था बकाल झाली आहे प्रबळ इच्छाशक्ती असेल तर समुद्राचे सौंदर्य खुलू शकेल त्यासाठी सर्व पक्ष व नागरिकांनी समुद्राच्या सौंदर्यासाठी एकत्र आले पाहिजे असे आवाहन मनसेच्या शर्मिला ठाकरे यांनी केले. मुंबईतील गिरगांव, प्रभादेवी, दादर, माहीम, वांद्रे, वर्सोवा, जुहू आक्सा व दानापानी या किंनाऱ्यांवर स्वच्छता मोहिमेसाठी शेकडो नागरिकांनी नावनोंदणी केली.

मुंबईसह पालघर, -ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, येथील विविध समुद्र किंनाऱ्यावर स्वच्छता मोहिमेत मनसेचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.तर कोकण किनारपट्टीवरील ४० समुद्र किनारे स्वच्छ करण्याचा संकल्प करण्यात आल्याचे यशवंत किल्लेदार यांनी सांगितले.

समुद्राच्या स्वच्छते करिता कोणीतरी पुढे तो दत्तक घेण्यात यावा जेणेकरून समुद्र स्वच्छ राहील आपण जे निर्माल्य टाकतो ते इतरत्र न टाकता तो कलशात टाकावे, प्लास्टिक बंद केले पाहिजे तसेच कचऱ्यासाठी एक डबा ठेवावा त्यापासून चांगले खत देखील तयार होऊ शकेल असे शर्मिला ठाकरे यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

10 वीचे वर्ग मित्र व्हॉट्सॲप माध्यमातून 30 वर्ष एकमेकांपासून दुरावलेले मित्र एकत्र

रविराज जामकर व कार्यकर्ते यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मा.दौलतराव पाटील आण्णा यांच्या प्रमुख उपस्थितत जाहीर प्रवेश

भुयेवाडीत गव्याला हाकलणाऱ्या तरुणावर हल्ला करताच तो जागीच ठार