घोडेबाजार करायला हा काय घोडय़ांचा तबेला आहे का.

सत्ताधारी आणि विरोधकां मध्ये जोरदार  जुगलबंदी


दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : 

 विधानसभा अध्यक्षांची निवड आवाजी मतदानाने करण्याच्या नियमबदल प्रस्तावावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार जुगलबंदी रंगली. कॉँग्रेसच्या नाना पटोले यांनी पक्षांतर बंदी कायदा हा घोडेबाजार बंद व्हावा म्हणून करण्यात आल्याचा संदर्भ देत आवाजी मतदानाने अध्यक्ष निवडीच्या प्रस्तावाचे समर्थन केले.त्यावर भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांनी घोडेबाजार करायला हा काय घोडय़ांचा तबेला असा सवाल केला.

घोडेबाजार या शब्दास मुनगंटीवार यानी तीव्र आक्षेप घेताच पटोले यांनी घोडेबाजार म्हटल्याने विरोधकांना त्रास का होतोय, असा टोला लगावला. त्यावर मुनगंटीवार यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी सभागृहातील आमदारांचा घोडेबाजार म्हणून अपमान केला आहे. घोडेबाजार करायला हा काय घोडय़ांचा तबेला आहे का. तुम्ही आमदारांचा घोडेबाजार म्हणून अपमान करायचा आणि ठोक घोडेबाजार झाला की तो मान्य करायचा. आम्ही मरून जाऊ पण आम्ही घोडेबाजार होऊ देणार नाही. तुम्हाला दहा वर्षे भाजपामध्ये चांगले संस्कार दिले, त्याचा उपयोग करा, असा टोला लगावला.

डाव्या बाजूचा आवाज ऐकू येईल?

दरम्यान, मुनगंटीवार यांनी गमतीने उपाध्यक्ष नरहरी झिरकाळ यांना एक कोपरखळी मारली. ते म्हणाले यश हे अंतिम नसते, अपयश हे घातक नसते. या दोन खेळांची मजा लुटायला धैर्य लागते. या सरकारला धैर्य नाही का. दुसरी बाब म्हणजे, तुम्ही सांगितलं की, मागे तुम्हीच सांगितलं होतं की तुम्हाला डाक्या कानाने ऐकू येत नाही. मग आवाजी मतदान घेतलं तर डाव्या बाजूचा आवाज तुम्हाला ऐकू येईल का?

Post a Comment

Previous Post Next Post