नृसिंहवाडीतील अतिक्रमणे हटविणार दत्त जयंतीच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीचा निर्णय

 


दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

नृसिंहवाडी : येथे मंदिर परिसरात काही ठिकाणी विविध दुकानांचे फलक लावल्याने भाविकांना दर्शन घेण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे. नृसिंहवाडीतील अतिक्रमणे हटविणार दत्त जयंतीच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीचा निर्णय; मंदिर मार्गावर भाविकांना अडथळा नृसिंहवाडी,येथे वाढणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन तसेच आगामी दत्त जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर येथील ग्रामपंचायतीने अतिक्रमण हटविणार असल्याचा निर्णय घेतला आहे.त्या दृष्टिकोनातून हालचाली सुरू केल्या आहेत, अशी माहिती ग्रामपंचायत प्रशासनाने आज दिली.

बसस्थानक ते दत्त मंदिर मुख्य महामार्ग, भाजी मंडई ,यात्री निवास व विठ्ठल मंदिर परिसर या ठिकाणी अतिक्रमण वाढत आहे. छोटे दुकानदार, व्यापारी, टपरीवाले यांच्याबाबत ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले होते. याचा फायदा बहुसंख्य दुकानदारांनी घेतला आहे. केलेले अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन ग्रामपंचायतीने केले. ग्रामपंचायतीने जी जागा दिली, त्याच्यापुढे काही दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे. कोरोना व महापुरानंतर प्रत्येक पौर्णिमा, गुरुवार, शनिवार, रविवार येथे गर्दी होते. येत्या १८ डिसेंबरला दत्तजयंती उत्सव सोहळा होणार आहे. येथे लाखो भाविकांच्या उपस्थितीत उत्सव होईल.

त्यामुळे वाढती गर्दी व नागरिकांची मागणी लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने अतिक्रमणाबाबत कठोर भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. कोट दत्त मंदिर परिसरात काही ठिकाणी अतिक्रमणे वाढली आहेत, ही वस्तुस्थिती आहे. हे सर्व अतिक्रमण काढण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला. संबंधित दुकानदारांनी सात दिवसांच्या आत अतिक्रमण स्वतःहून काढून घ्यावे. अन्यथा कारवाई करण्यात येईल.'' - रमेश मोरे, उपसरपंच दत्त मंदिर परिसरात अतिक्रमणाचा प्रश्न हा महत्त्वाचा व गंभीर आहे. ग्रामपंचायतीने याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा. सर्वांनी या कामी सहकार्य करावे. भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनाने कटिबद्ध राहावे.'' - गिरीश खोंबारे, सामाजिक कार्यकर्ते

Comments

Popular posts from this blog

10 वीचे वर्ग मित्र व्हॉट्सॲप माध्यमातून 30 वर्ष एकमेकांपासून दुरावलेले मित्र एकत्र

रविराज जामकर व कार्यकर्ते यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मा.दौलतराव पाटील आण्णा यांच्या प्रमुख उपस्थितत जाहीर प्रवेश

भुयेवाडीत गव्याला हाकलणाऱ्या तरुणावर हल्ला करताच तो जागीच ठार