पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषदेवर 31 डिसेंबर पासून राज्य शासनाने प्रशासक नियुक्तीदैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

 पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषदेवर 31 डिसेंबर पासून राज्य शासनाने प्रशासक नियुक्ती केली असून, प्रशासकपदी मुख्याधिकारी स्वरूप खरगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.याबाबतचे पत्र आज पन्हाळा पालिकेला प्राप्त झाले.

कोरोनामुळे नगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असून, त्यामुळे पालिका पदाधिकाऱ्यांची मुदत संपल्यानंतर प्रशासक म्हणून पालिकेचा कार्यभार मुख्याधिकारी स्वरूप खरगे हे पहाणार आहेत, पन्हाळा नगरपालिकेत गेली पाच वर्षे जनसुराज्य शक्ती पक्षाची निर्विवाद सत्ता होती. पालिका निवडणूकीसाठी इच्छुकांची मोर्चे बांधणी सुरू असताना निवडणूक आयोगाने हि निवडणूक पुढे ढकलल्याने इच्छुकांच्यात नाराजी पसरली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post