पिंपरी पोलिसांनी वल्लभनगर आगाराबाहेर असलेला संपकऱ्यांचा तंबू हलविलादैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

पिंपरी : अद्याप कामावर हजर न झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांविरोधात राज्य सरकार कठोर पाऊले उचलण्याच्या तयारीत दिसत आहे. त्या अंतर्गत पिंपरी पोलिसांनी वल्लभनगर आगाराबाहेर असलेला संपकऱ्यांचा तंबू हलविला आहे.परिणामी संपेकऱ्यांना एसटी आगारांपासून २०० मीटर लांब संपाला बसण्याची परवानगी दिली आहे. दरम्यान संपेकऱ्याविरूद्ध आगाराकडून पोलिसात तक्रारअर्ज दिला आहे.

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप गेल्या २५ दिवसांपासून सुरू आहे. जे कामगार संपावर राहतील त्यांच्यावर कारवाई करेल असा इशारा राज्य सरकारकडून देण्यात आला आहे. सेवा समाप्ती आणि निलंबनाच्या कारवाईला घाबरणार नाही, अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. पगारवाढ दिल्यानंतरही एसटी कर्मचाऱ्यांमध्ये फूट पडल्याचे दिसत आहे.

कारण काही कर्मचारी कामावर परतले आहेत. मात्र, जे कर्मचारी अद्याप कामावर परतले नाहीत, त्यांच्यावर आता कारवाई करावीच लागणार, असा इशारा राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे. त्यानुसार संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांची जागा बदलण्यात आली आहे. त्यांच्यावर पोलिसांनी सकाळीच कारवाई केली आहे. त्यांना आगाराच्या फाटकासमोरून हलविण्यात आले आहे. आगारापासून २०० मीटर दूर मंडप टाकण्यास सांगितल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post