राधानगरी : अचानक गव्याने केलेल्या हल्ल्यात एक महिला जखमीदैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

राधानगरी : शेतात काम करत असताना अचानक गव्याने केलेल्या हल्ल्यात एक महिला जखमी झाली. आलका लहू चौगुले (वय-४५ ) असे या जखमी महिलेचे नाव आहे. सोन्याची शिरोली येथे आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली.याबाबत माहिती अशी की, आलका चौगुले या पती समवेत शेरी नावाच्या शेतात काम करत होत्या. दरम्यान अचानक गव्याने आलका चौगुले यांच्यावर हल्ला केला. यात त्या जखमी झाल्या. त्यांना तात्काळ राधानगरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर त्यांना कोल्हापुरातील सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.


या घटनेची माहिती मिळताच प्रादेशिक विभागाचे वनक्षेत्रपाल एस.बी.बिराजदार यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. गेल्या चार दिवसापासून जिल्ह्यात गव्याने ठाण मांडला आहे. कोल्हापूर शहरात गव्याने केलेल्या हल्ल्यात भुयेवाडी (ता. करवीर) येथील तरुणाचा मृत्यू झाला. या गव्याना वनअधिवासात सोडण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न सुरु आहेत. यातच राधानगरीतील ही घटना समोर आली. गव्याचा मानवी वस्तीतील वाढत असलेला वावर चिंतेची बाब बनत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post