गव्याला पकडण्यात अडचणी येऊ नये म्हणून शहरात १४४ कलम लागू

वन विभाग, स्थानिक पोलीस आणि प्राणीमित्र गव्याला पकडण्याचे प्रयत्न करत आहेत


दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

सांगलीच्या सीमेवर फिरत असलेला गवा मध्यरात्री शहरात दाखल झाला. सांगली शहरातील प्रमुख मार्गावरून गवा रेड्याने मार्गक्रम करीत सकाळच्या सुमारास बाजार समिती गाठली.वन विभाग, स्थानिक पोलीस आणि प्राणीमित्र गव्याला पकडण्याचे प्रयत्न करत आहेत. मात्र गवा मुख्य शहरात दाखल झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गर्दी होऊ नये आणि गव्याला पकडण्यात अडचणी येऊ नये म्हणून शहरात १४४ कलम लागू केले आहे. गवा घुसल्याने आज बाजार समिती बंद ठेवली आहे. या एका दिवसात १० कोटींची उलाढाल ठप्प होण्याची शक्यता आहे. दरम्यान गव्याला पकडण्यासाठी वनविभाग, महसूल प्रशासन, बाजार समिती प्रशासन, पोलीस आणि अग्निशमन दलाकडून प्रयत्न सुरू आहेत. सध्या गव्याला एका ठिकाणी थांबवण्यात आलंय. मात्र, त्याला पकडण्यात यश आलेलं नाही. हा गवा गेल्या चार दिवसांपासून या परिसरात फिरतोय. पुणे आणि कोल्हापूरवरून तज्ज्ञांचं पथक या गव्याला पकडण्यासाठी बोलावण्यात आलंय, अशी माहिती विभागीय वनअधिकारी अजित साजने यांनी दिली.

शहरात कलम १४४ लावल्यामुळे आज बाजार समितीतील हळदी आणि गुळाचे सौदे आणि धान्याची खरेदी-विक्रीची उलाढाल होणार नाही. त्यामुळे आज दिवसभरात जवळपास १० कोटी रुपयांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यापारी आणि शेतकऱ्यांनी आज बाजार समितीत न येऊन गर्दी टाळण्यास मदत करावी, असं आवाहन बाजार समितीचे सचिव महेश चव्हाण यांनी केलं.

Comments

Popular posts from this blog

10 वीचे वर्ग मित्र व्हॉट्सॲप माध्यमातून 30 वर्ष एकमेकांपासून दुरावलेले मित्र एकत्र

रविराज जामकर व कार्यकर्ते यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मा.दौलतराव पाटील आण्णा यांच्या प्रमुख उपस्थितत जाहीर प्रवेश

भुयेवाडीत गव्याला हाकलणाऱ्या तरुणावर हल्ला करताच तो जागीच ठार