सांगलीच्या 100 फुटी रोडवरील भोबे गटारीची स्वच्छता महापालिका प्रशासनाने हाती घेतली

आतापर्यंत 10 टन प्लॅस्टिक व अन्य कचरा बाहेर काढण्यात आला .


दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

सांगलीच्या 100 फुटी रोडवरील भोबे गटारीची स्वच्छता महापालिका प्रशासनाने हाती घेतली आहे. या मध्ये आतापर्यंत 10 टन प्लॅस्टिक व अन्य कचरा बाहेर काढण्यात आला आहे. आरोग्य विभागाने भोबे गटाराची स्वच्छता मोहीम हाती घेतली असून, दिवसभरात भोबे गटारीची 70 टक्के स्वच्छता करण्यात आली आहे.सांगली येथील भोबे गटरीमध्ये कचरा आणि अन्य प्लॅस्टिक साहित्य साचून राहिल्याने ते गटार प्रवाहित होत नव्हते. ही बाब लक्षात घेऊन मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशाने आणि उपायुक्त राहुल रोकडे यांच्या सूचनेनुसार जेसीबीच्या साहाय्याने भोबे गटार स्वच्छ करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. शनिवारी दिवसभरात साधारण 70 टक्के काम पूर्ण करून 10 टन प्लॅस्टिक व गाळ कचरा काढण्यात आला असून, अजूनही पाच टन प्लॅस्टिक कचरा निघण्याची शक्यता आहे. संपूर्ण भोबे गटार स्वच्छतेचे काम मंगळवारपर्यंत पूर्ण होईल. या भोबे गटारीमधून प्लॅस्टिक कचरा व इतर कचरा मोठ्या प्रमाणात आढळून आला असल्याने नागरिकांनी गटारीमध्ये कचरा टाकू नये, असे आवाहन महापालिकेकडून नागरिकांना करण्यात येत आहे.

उपायुक्त राहुल रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्याधिकारी रवींद्र ताटे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, स्वच्छता निरीक्षक प्रणिल माने, गणेश माळी यांच्यासह आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांकडून हे काम केले जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post