आमदार नितेश राणे यांचा अटपूर्व जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळून लावला

 


दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

भाजपा आमदार नितेश राणे यांनी शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांना झालेल्या मारहाण प्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, हा अर्ज न्यायालयानं फेटाळून लावला आहे.त्यामुळे नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार अद्याप कायम आहे. या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांच्यासमोरील अडचणींमध्ये वाढ झाली आहे. मात्र, आज नेमकं न्यायालयात सुनावणी दरम्यान काय झालं? नितेश राणेंना कोणतं कारण सांगून अटकपूर्ण जामीन अर्ज नाकारण्यात आला, याविषयी चर्चा सुरू झाली आहे. त्यावर नितेश राणेंचे वकील संग्राम देसाई यांनी माध्यमांशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे.

काय आहे प्रकरण?

गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापल्याचं दिसून आलं. नुकत्याच संपलेल्या हिवाळी अधिवेशनात देखील या प्रकरणाचे पडसाद दिसून आले. शिवसेनेचे स्थानिक कार्यकर्ते संतोष परब यांनी आपल्याला मारहाण झाल्याची तक्रार दाखल केली आहे. तसेच, आपल्याला मारहाण करणाऱ्या व्यक्तीने नितेश राणेंचं नाव घेतल्याचं देखील त्यांनी तक्रारीत नमूद केलं आहे. त्यामुळे संतोष परब यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या तक्रारीत नितेश राणेंचं नाव देखील आलं आहे.Post a Comment

Previous Post Next Post