उल्हासनगर : जगभरातील सिंधी समाजाचे दैवत असलेल्या उल्हासनगर मधील चालिया मंदिराच्या दानपेटीवर माजी सुरक्षा रक्षकानेच डल्ला मारलादैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

 उल्हासनगर : जगभरातील सिंधी समाजाचे दैवत असलेल्या उल्हासनगर मधील चालिया मंदिराच्या दानपेटीवर माजी सुरक्षा रक्षकानेच डल्ला मारला आहे.दानपेटीतील चिल्लरचे पोते खांद्यावर नेत असतानाच हा रक्षक हिललाईन पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.विशेष म्हणजे पोत्यातील 6 हजाराची चिल्लर मोजण्यासाठी दीडदोन तास घेण्याची वेळ पोलिसांवर आली.या चिल्लर चोर आरोपीचे नाव लालजित कुमार लोधी आहे.लालजित हा यापूर्वी चालिया मंदिरात सुरक्षा रक्षक म्हणून काम करायचा.शुक्रवारच्या रात्री लालजितन मंदिरात प्रवेश करून दानपेटी फोडली.आणि त्यातील सर्व चिल्लर आणि थोड्या प्रमाणात 10,20,50,100 च्या नोटा पोत्यात भरून घेऊन पोबारा केला.

लालजित हा कैलास कॉलनी च्या दिशेने इकडेतिकडे बघून संशयास्पदरित्या जात असतानाच हिललाईन ठाण्याचे पोलीस नाईक भटू महाले आणि कॉन्स्टेबल नरेंद्र बागुल यांनी लालजितला हटकले तेंव्हा त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला.पोलिसांनी त्याला पकडल्यावर आणि पोते तपासल्यावर त्यात चिल्लर आढळून आली. लालजितला पोलीस ठाण्यात आणल्यावर हिललाईन ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण सारिपूत्र यांनी त्याच्याकडे चिल्लरची चौकशी केली असता,त्याने ती चालिया मंदिराच्या दानपेटीतून चोरी केल्याची कबूली दिली.

"आणि 8 पोलिसांनी मोजून काढली चिल्लर"

पोलिसांनी पोत्यातील चिल्लर टेबलावर टाकण्यात आली आणि 8 जणांनी मिळून दीडदोन तास केलेल्या मोजणीत 6 हजाराची चिल्लर असल्याचे निष्पन्न झाले.न्यायालयीन प्रक्रियेनंतर ही चिल्लर चालिया मंदिराच्या ट्रस्टीच्या सुपूर्द करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण सारिपूत्र यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog

10 वीचे वर्ग मित्र व्हॉट्सॲप माध्यमातून 30 वर्ष एकमेकांपासून दुरावलेले मित्र एकत्र

रविराज जामकर व कार्यकर्ते यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मा.दौलतराव पाटील आण्णा यांच्या प्रमुख उपस्थितत जाहीर प्रवेश

भुयेवाडीत गव्याला हाकलणाऱ्या तरुणावर हल्ला करताच तो जागीच ठार