तर कोल्हापुरात एकाही कन्नड व्यापाराचे दुकान सुरू होऊ देणार नाही..

अखिल भारतीय मराठा महासंघाचे नेते वसंत मुळीक यांचा इशारा..

दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

 कोल्हापूर : सीमाभागातील मराठी भाषिकांवर कन्नड वेदिका संघटनेचे गुंड सातत्याने हल्ले करत आहेत. आम्ही याचा निषेध करतो. हे हल्ले जर थांबले नाहीत तर कोल्हापुरात  एकाही कन्नड व्यापाराचे दुकान सुरू होऊ देणार नाही.कर्नाटक बस जिल्ह्यात फिरू देणार नाही. असा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाचे नेते वसंत मुळीक यांनी दिला. दसरा चौक येथे झालेल्या निषेध सभेमध्ये ते बोलत होते.

बेळगाव येथे महाराष्ट्र एकीकरण समितीचे  पदाधिकारी दीपक दळवीयांच्यावर कन्नड गुंडांनी शाई फेकली. या घटनेचा निषेध करण्यासाठी मराठा महासंघाच्या वतीने दसरा चौकात निषेध सभेचे आयोजन केले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या.

याप्रसंगी वसंत मुळीक म्हणाले, सीमा भागामध्ये गेली 65 वर्षे मराठी भाषिक लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहेत. सीमाभाग महाराष्ट्रामध्ये यावा यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र कर्नाटक सरकार त्यांच्यावर अत्याचार करत आहेत. आजही महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी असलेल्या दीपक दळवी यांच्यावर शाई फेकण्यात आली. हा महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेचा अपमान आहे. ही दडपशाही सहन केली जाणार नाही. पुन्हा अशी घटना घडली तर कोल्हापुरात एकाही कन्नड व्यापाऱ्याला दुकान उघडू देणार नाही. कर्नाटक सरकारची एकही बस जिल्ह्यात फिरणार नाही. असा इशारा देण्यात आला.

यावेळी गुलाबराव घोरपडे, संभाजी जगदाळे, शिवाजीराव परुळेकर, महादेव पाटील, इंद्रजीत सावंत, शाहीर दिलीप सावंत, बबन रानगे, कादर मलबारी, जयश्री भोसले, अशोक पोवार. यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post