हुपरी येथे प्रभाग क्र.१ मध्ये कोविड लसीकरणास चांगला प्रतिसाद
दैनिक हुपरी समाचार :
हुपरी (वार्ताहर) कोरोनाचे संकट अद्याप सरलेले नाही. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी शासनाने दिलेल्या लसींचा लाभ घेणे अत्यावश्यक आहे. या लसीमुळे आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती चांगल्या पद्धतीने निर्माण होते. आणि आपण पूर्ण क्षमतेने कोरोनाला लढा देऊ शकतो. असे प्रतिपादन हुपरी मधील प्रसिद्ध धन्वंतरी डॉ.अमोल गाट यांनी केले. प्रभाग क्रमांक एक मध्ये अद्याप ज्या नागरिकांनी कोविड लसीकरणाचा लाभ घेतलेला नाही त्यांच्यासाठी लसीकरण शिबिराचे आयोजन केले होते. प्रभागाचे लोकप्रतिनिधी हुपरी नगरीचे उपनगराध्यक्ष गणेश वाईंगडे व नगरसेविका अनिता मधाळे यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन केले होते. सकाळपासून दुपारी तीन पर्यंत या शिबिरामध्ये जवळजवळ पाचशे नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला. यासाठी या भागातील प्रसिद्ध धन्वंतरी डॉ.अमोल गाट यांनी मोलाचे सहकार्य केले. सकाळपासून नागरिकांनी लसीकरणासाठी रांगा लावल्या होत्या. दुपारच्या सत्रापर्यंत लसीकरण पूर्ण झाले. अशाप्रकारे नागरिकांनी या लसीकरण शिबिराला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला.
या शिबीरात डॉ.अमोल गाट, डॉ. गोमटेश एकांडे, डॉ. नितीन घोरपडे, आरोग्यसेवक विशाल जगताप, डाटा ऑपरेटर अनिलराव माळी, सौ.लता मारुती शिंगे, श्रीमती मनीषा शहाजी भंडारे, वनिता विकास कुरणे, सोनाली यादव तसेच आशासेविका विश्रांती शामराव कांबळे, मनीषा सूर्यकांत गजरे यांनी या लसीकरण शिबिरामध्ये भाग घेऊन लसीकरण अभियान यशस्वी करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
Comments
Post a Comment