हुपरीतील नरके खणीची स्वच्छता न झाल्यास ११फेब्रुवारी पासून प्रहार कडून आमरण उपोषण

 शहाबुद्दीन घुडूभाई व अनिल गावडे यांचा इशारा.                        

      

दैनिक हुपरी समाचार :

 हुपरी शहरामध्ये नरके खण प्रसिद्ध असून पूर्वीपासून या खणीतील पाण्याचा वापर भागातील लोक करत आहेत. आज रोजी सदर खणीमध्ये भरपूर प्रमाणात जलपर्णी व पाणेरी झाडांची संख्या वाढली आहे, परिणामी या भागात अस्वच्छता पसरली आहे.पाण्याचा वासदेखील भरपूर येत आहे.त्यामुळे बाजूच्या रस्त्यावरून जाणे-येणे अशक्य झाले आहे. तसेच जवळपास राहणाऱ्या लोकांना डेंग्यू-चिकनगुणिया यांसारख्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहे.मागील काही महिन्यांत जवळपास राहणाऱ्या घरातील बऱ्याच लोकांना डेंग्यू ची लागण झाली आहे, पुन्हा हा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आपणाकडून यावर कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे, परिणामी हुपरी शहराच्या सौंदर्यात आणखीनच भर पडणार आहे .

अशा आशयाचा विनंती अर्ज प्रहार जनशक्ती पक्षाकडून हुपरी नगरपालिकेला यापूर्वी दि.६डिसेंबर २०२१ रोजी देवून व वारंवार भेटून देखील नगरपालिकेकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही, म्हणूनच अगर १०फेब्रुवारी २०२२ च्या आत सदर खणीची स्वच्छता न झालेस प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने दि.११फेब्रुवारी २०२२रोजीपासून आमरण उपोषण करण्यात येईल.

Post a Comment

Previous Post Next Post