प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी कार्यवाही करा !

 हुपरी येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रशासनास निवेदन सादर 


दैनिक हुपरी समाचार :

हुपरी:  - राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दिवशी अनेकजण राष्ट्रध्वज विकत घेऊन मोठ्या अभिमानाने मिरवतात; मात्र हेच कागदी आणि प्लास्टिकचे छोटे-छोटे राष्ट्रध्वज त्याच दिवशी रस्त्यावर, कचर्‍यात किंवा गटारात पडलेले आढळतात. प्लास्टिकचे ध्वज लवकर नष्टही होत नाहीत, त्यामुळे अनेक दिवस या राष्ट्रध्वजाची विटंबना पहावी लागते, तसेच ‘प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री करणे’, हे कायदाबाह्य ठरते. तरी प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाची अशा प्रकारे होणारी विटंबना रोखण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पाऊले उचलावीत, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हुपरी येथे मुख्याधिकारी स्नेहलता कुंभार यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हुपरी नगराध्यक्षा सौ. जयश्री गाठ, उपनगराध्यक्ष राजाभाऊ वाईंगडे,  तसेच स्वीकृत नगरसेवक श्री. सुभाष कागले उपस्थित होते.

निवेदन स्वीकारल्यावर मुख्याधिकारी स्नेहलता कुंभार यांनी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रध्वजाच्या प्रबोधना संदर्भात तयार करण्यात आलेली ध्वनीचित्रफित प्रसारित करण्याचा प्रयत्न करू, असे आश्‍वासन दिले.

महाविद्यालयात निवेदन - हिंदु जनजागृती समितीच्या  वतीने शांता रामकृष्ण दातार इंग्लिश स्कूल आणि परीसन्ना इंग्रोळी ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य बी. आर. भिसे, जनता विद्यालय हुपरीचे मुख्याध्यापक डी. ए. पाटील यांना, तसेच चंद्रबाई शांताप्पा शेंडुरे कॉलेजच्या प्राचार्य श्रीमती पाटील यांना निवेदन देण्यात आले. सर्वच महाविद्यालयांनी समितीचा उपक्रम योग्य असल्याचे सांगून या संदर्भात राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखण्यासाठी विद्यार्थ्यांना सूचना देऊ असे सांगितले. 

प्लास्टिकचे ध्वज, तिरंगा मास्क विक्री करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करा - हुपरी पोलीस ठाण्यात निवेदन

यदा दुकानातून, तसेच ‘ऑनलाईन’ पद्धतीने तिरंग्याच्या रंगातील ‘मास्क’ची विक्री होत असल्याचे आढळून आले आहे. तिरंग्याचा मास्क वापरल्याने राष्ट्रध्वजाचे पावित्र्य राखले जात नाही. ‘तिरंगा मास्क’ हे देशप्रेम प्रदर्शनाचे माध्यम नाही. अशोकचक्रासह तिरंग्याचा मास्क बनवणे आणि वापरणे, हा ध्वजसंहितेनुसार राष्ट्रध्वजाचा अवमानच आहे. तरी जे विक्रेते शासनाचा अध्यादेश डावलून प्लास्टिकचे ध्वज, तिरंगा मास्क यांची विक्री करतात,तसेच  ज्या व्यक्ती, दुकाने, आस्थापना, संघटना अथवा समूह आदी  राष्ट्रध्वजाचा अवमान करतात, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी,  या मागणीचे निवेदन हुपरी पोलीस ठाण्यात साहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश खराडे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी साहाय्य पोलीस निरीक्षकांनी असे प्लास्टिक ध्वज अथवा तिरंगा मास्क आढळ्यास कारवाई करू असे आश्‍वासन दिले. 

या वेळी साप्ताहिक कलादर्पणचे संपादक श्री. संजय पाटील, लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेचे शहराध्यक्ष श्री. नितीन काकडे, सद्गुरु बहुउद्देशीयसंस्थेचे श्री. रवींद्र गायकवाड, धर्मप्रेमी सर्वश्री रामभाऊ मेथे, संभाजी काटकर, प्रसाद देसाई, गणेश घोरपडे, आेंकार फडतारे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे उपस्थित होते. Post a Comment

Previous Post Next Post